“उद्धव ठाकरे म्हणतात सरकार पाडून दाखवा, पण ज्यादिवशी हे सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणार देखील नाही”

मुंबई | काल 15 ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त दसरा सोहळा पार पडला. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. त्यामध्ये त्यांनी विरोधी पक्षनेत्यांवर चांगलाच हल्लबोल केला असल्याचं पाहायला मिळालं.

उद्धव ठाकरेंनी बोलता-बोलता विरोधकांना राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा असं आव्हान केलं होतं. त्यांच्या या आव्हानाला विरोधीपक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच सडेतोड उत्तर दिलं असल्याचं कळतं आहे.

उद्धव ठाकरे म्हणतात आमचं सरकार पाडून दाखवा, पण ज्यादिवशी हे सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणार देखील नाही, असा सूचक इशारा अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. फडणवीस आज मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

सरकार पाडून दाखवा, पाडून दाखवा सारखं म्हणतायत. मीच तुम्हाला आव्हान देतो की, तुम्ही एकदा सरकार चालून तर दाखवा, कामं करुन तर दाखवा, शेतकऱ्यांना मदत करुन तर दाखवा, शेतकऱ्यांना दिलासा देऊन तर दाखवा, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

तसेच दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे विचारांचं सोनं नव्हतं. तर ते मुख्यमंत्र्यांच नैराश्य होतं. असंगाशी संग केलात की असंच होणार, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सणसणीत टोलाही लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचे दर

भिवंडीमध्ये फर्निचर कारखान्यांना लागली आग, सहा तासांनंतर अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश

आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये झाली वाढ

“आम्हाला उद्धवजींमध्ये राहूल गांधी स्पष्ट दिसू लागले आहेत”

निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदूस्थान- संभाजी भिडे