मुंबई | शिवसेना आणि राणे यांच्यातील वाद आता राज्याला नवा राहिलेला नाही. कोकणात होऊ घातलेल्या नाणार प्रकल्पावरून राणे कुटुंबाकडून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येत आहे.
नाणार येथील रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू गावात हलवण्यात येणार असल्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिल्याचं समोर येत आहे.
ठाकरेंनी जर मोदींना पत्र लिहिलं असेल तर आता शिवसेना वेगळी भूमिका घेत असल्याचं दिसत आहे, असं भाजप आमदार नितेश राणे म्हणाले आहेत.
राजापूर तालुक्यात शिवसेनेशी संबंधीत जागेचे मोठे व्यवहार झाले आहेत. बारसू गावात प्रकल्प नेण्यात येत असल्यानं काहीतरी गौडबंगाल नक्की आहे, असा आरोप राणेंनी ठाकरेंवर केला आहे.
रिफायनरी प्रकल्पाबाबत लवकरच पेनड्राईव्ह बाहेर काढणार आहोत, असा इशारा राणेंनी शिवसेनेला दिला आहे. आम्ही या विषयाचा खोलात जाऊन अभ्यास करू, असं राणे यांनी म्हटलं आहे.
कोकणासह सर्व महाराष्ट्रातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. राज्य सरकार यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.
रिफायनरीबाबत शिवसेना नेहमी आपली भूमिका बदलते. पहिल्यांदा विरोध करायचा, नंतर पाठिंब्याचे बॅनर झळकवायचे, असा प्रकार शिवसेना करते अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट घेवून लवकर रिफायनरीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचंही नितेश राणे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“90% आमदार नाराज, ऐनवेळी शिवसेना-काँग्रेसचे आमदार फोडण्याचा डाव”
काळजी घ्या रे…! राज्यात उष्माघाताचा पहिला बळी; ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्याचा जीव गेला
मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात
“संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही”