मुंबई | गायिका फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांच्या कार्यक्रमाविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली होती.
कांदिवली (पश्चिम) येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात (Pramod Mahajan Krida Sankul) पाठक यांचा दांडिया कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे या मैदानाचे व्यावसायिकीकरण (Commercialization) सुरु असल्याच्या कारणामुळे त्यांच्याविरोधात याचिका करण्यात आली होती.
ही याचिका न्यायायालयाने अनेक कारणांवरुन फेटाळली आहे. पाठक यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक यशवंत सानप (Vinayak Yashwant Sanap) यांनी ही याचिका केली होती.
ही याचिका शेवटच्या क्षणाला करण्यात आली. यात याचिकेत कार्यक्रमातील आयोजकांना प्रतिवादी करण्यात आले नाही. याचिका अभ्यासपूर्ण नाही, अश्या काही सबबींवर याचिका फेटाळण्यात आली.
याचिकाकर्त्यांनी 2019 साली देखील अशाच स्वरुपाची याचिका केली होती. ती देखील अभ्यास न करता करण्यात आली होती. त्यामुळे ही याचिका सतत अभ्यासाशिवाय आणि अर्धवट येत असल्याने फेटाळण्यात आली आहे.
याचिकाकर्ते सानप यांनी या मैदानाचे व्यावसायिकीकरण रोखण्याची विनंती न्यायालयाला केली होती. तसेच या मैदानावर सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना मोफत परवानगी द्यावी, अशी मागणी देखील केली होती.
महत्वाच्या बातम्या –
“… तर आम्हाला आमच्या मार्गाने जावे लागेल”; अण्णा हजारेंचा राज्य सरकारला इशारा
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी ‘भारत जोडो’ यात्रेवरुन भाजपवर केली टीका; म्हणाल्या काँग्रेसच्या…
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून श्रीकांत शिंदे कारभार सांभाळतात! राष्ट्रवादीने दिला पुरावा
राज ठाकरेंच्या ‘मुन्नाभाई’ उल्लेखावर मनसेचे प्रत्युत्तर; उद्धव ठाकरेंना दिली ‘या’ कलाकाराची उपमा