मुंबई | मुख्यमंत्री असताना आपल्या अधिकारांचा गैरवापर करत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याच प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना नोटीस पाठवली आहे. फडणवीसांबरोबर राज्याच्या तत्कालिन मुख्य सचिवांना देखील न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.
न्यायालयाने पाठवलेल्या नोटीसीमध्ये फडणवीसांना आठ आठवड्यामध्ये उत्तर पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. मोहनीश जबलपुरे यांनी फडणवीसांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना सरकारी कर्माचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळवल्याचा आरोप आहे. तर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्याच बँकेत उच्चपदस्थ अधिकारी होत्या. त्याचमुळे फडणवीसांनी पदाचा गैरवापर करत कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळवल्याचा आरोप आहे.
फडणवीसांच्या आदेशानुसार ही कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वर्ग केल्याचा दावा नागपुरमधील सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी केला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही वेळोवेळी स्पष्टीकरण देऊन आपण असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचा दावा केला आहे. मार्च 2005 मध्ये म्हणजेच अमृता यांच्याशी लग्न होण्याच्या आठ महिने आधीच ही खाती अॅक्सिस बँकेत उघडली गेल्याचा दावा फडणवीसांनी यापूर्वी केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-नड्डाजी, खासदारकीचं तिकीट द्या बरं का- रामदास आठवले
-वक्तव्य मागे घ्या, अन्यथा… ब्राह्मण महासंघाचा सुजय डहाकेला इशारा
-सुजय डहाकेला कानफडण्याची सौरभ गोखलेची भाषा; काढली थेट लायकी!
-अण्णा हजारे यांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; पत्रात म्हणतात…
-दाभोळकर हत्याप्रकरणातील ‘हा’ मोठा पुरावा सापडला सीबीआयच्या हाती!