नड्डाजी, खासदारकीचं तिकीट द्या बरं का- रामदास आठवले

नवी दिल्ली | महाराष्ट्रातून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आज दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली आहे.

आगामी राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या कोट्यातून आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी मागणी आठवले यांनी नड्डा यांच्याकडे केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर नड्डा आणि आठवले यांची पहिल्यांदाच भेट होत आहे. यावेळी आठवलेंनी नड्डा यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ही मोठी जबाबदारी असून जे. पी. नड्डा हे अभ्यासू नेते आहेत. ते त्यांची जबाबदारी योग्यरित्या पार पाडतील, असा विश्वास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

दरम्यान, आठवले यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपत आहे. त्यामुळे 26 मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांना संधी मिळावी यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-वक्तव्य मागे घ्या, अन्यथा… ब्राह्मण महासंघाचा सुजय डहाकेला इशारा

-सुजय डहाकेला कानफडण्याची सौरभ गोखलेची भाषा; काढली थेट लायकी!

-अण्णा हजारे यांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; पत्रात म्हणतात…

-दाभोळकर हत्याप्रकरणातील ‘हा’ मोठा पुरावा सापडला सीबीआयच्या हाती!

-…म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या 7 खासदारांना केलं निलंबित!