वाद भोंग्यांचा! मुंबई पोलिसांनी दिली ‘इतक्या’ भोंग्यांना परवानगी

मुंबई | राज्य असो की देश असो सध्या फक्त भोंग्यांचा विषय चर्चेत आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात अचानकपणे हिंदूत्वाची लाट आल्याचं पहायला मिळत आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मशीदींवरील भोंग्यांचा मुद्दा उचलल्यानंतर आता राज्यात त्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. परिणामी वाद देखील वाढला आहे.

मशींदीवरील भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं यापुर्वीच निकाल दिला आहे. अशातच आता मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेल्या भोंग्याचा आकडा समोर आला आहे.

मुंबई पोलिसांनी 803 मशीदींना भोंग्याची परवानगी दिल्याचं स्पष्ट झालं आहे. परिणामी आता ही परवानगी कोणत्या आधारावर देण्यात आली आणि केव्हा देण्यात आली याची चर्चा रंगली आहे.

2015 मध्ये लाऊडस्पीकरबाबत राज्य सरकारनं एक जीआर प्रसिद्ध केला होता. त्यानंतर राज्यात त्या नियमावलीनुसार परवानगी देण्यात येते.

प्रदूषण होत असल्यास तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई देखील करण्यात येते. परिणामी याबाबत आतापर्यंत अनेक तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत.

राज ठाकरेंनी मशीदींवरील भोंग्यांचा विषय काढल्यानं राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत पोलीस सतर्कता बाळगत आहेत.

दरम्यान, ठाकरे सरकारनं 4 मेपर्यंत भोंगे उतरवावे अन्यथा परिस्थितीचा सामना करावा असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिल्यानं ठाकरे विरूद्ध ठाकरे संघर्ष टोकाला गेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणून राज ठाकरेंवर देशद्रोहाचं कलम लावलं नाही”

 …अन् प्रसिद्ध अभिनेत्याला न्यूजरूममधून अँकरने काढलं बाहेर; पाहा व्हिडीओ

“बाहेरून गुंड आणून मुंबईत गोंधळ करण्याचा डाव”; संजय राऊतांचे गंभीर आरोप

 “अहो आदित्यजी अशा घटना घडल्या तेव्हा तुम्ही रांगत होता, त्यामुळे इतिहास….”

“…तर आम्ही त्यांना सोडणार नाही”; भीम आर्मीचा राज ठाकरेंना गंभीर इशारा