मुंबई हादरली! धावत्या कारमध्येच अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई | महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ईस्टर्न फ्री वेवर धावत्या कारमध्ये नराधमांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

तीन आरोपी कंपनीची गाडी घेऊन 29 जुलै रोजी संध्याकाळी फिरायला निघाले होते. यावेळी त्यांनी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं आणि कार जोराने चालवू लागले. तिघांनी धावत्या कारमध्येच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि मुलीला ईस्टर्न फ्री वेवर सोडून फरार झाले.

पीडित अल्पवयीन मुलीनं घडलेला सर्व प्रकार तिच्या काकीला सांगितला. घडलेला सर्व प्रकार ऐकताच पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी लगेचच हालचाली सुरू करत फ्री वेवरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि तपास घेत आरोपींना अटक केली.

पोलिसांनी आरोपींवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भर दिवसा घडलेल्या या प्रकरणामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘नारायण राणेंचे जेव्हा आम्ही पाठीराखे होतो तेव्हा त्यांचे पोट्टे बनियनवर होते’; गुलाबरावांचं राणेपुत्रांना सणसणीत प्रत्युत्तर

भाजपचा ‘हा’ बडा नेता शरद पवारांच्या भेटीला; सुप्रिया सुळेंनी फोटो केला शेअर!

शेवग्याची पानं ‘या’ रुग्णांसाठी ठरू शकतात संजीवनी; वाचा सविस्तर!

सुशांतच्या शरीरावरील ते पांढरे डाग नेमके कशाचे?; फॉरेन्सिक रिपोर्टने केला उलगडा

‘ए मौत तूने मुझें जमींदार कर दिया’; प्रसिद्ध गझलकार राहत इंदौरी याचं निधन