महाराष्ट्राने कोरोना नियंत्रणात आणला तर देश ही लढाई जिंकेन- नरेंद्र मोदी

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा उपाययोजनांचा आढावा घेतला.

जर महाराष्ट्र आणि इतर नऊ राज्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवलं तर देश ही लढाई जिंकेल. कोरोनाच्या केसेसचे 72 तासांमध्ये अहवाल, जास्तीजास्त चाचण्या यामुळे आपण या महामारीवर मात करू शकतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रासोबतच गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यावेळी कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

देशात सध्या सहा लाखांपेक्षा अधिक रूग्ण आहेत. यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त या दहा राज्यांमध्ये आहेत. यासाठी आम्ही आज समिक्षा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. तसंच एक बाबही लक्षात आली. जर या दहा राज्यांना करोनावर मात करण्यास यश मिळालं तर आपला देशही ही लढाई जिंकू शकेल, असंही मोदींनी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘नारायण राणेंचे जेव्हा आम्ही पाठीराखे होतो तेव्हा त्यांचे पोट्टे बनियनवर होते’; गुलाबरावांचं राणेपुत्रांना सणसणीत प्रत्युत्तर

भाजपचा ‘हा’ बडा नेता शरद पवारांच्या भेटीला; सुप्रिया सुळेंनी फोटो केला शेअर!

शेवग्याची पानं ‘या’ रुग्णांसाठी ठरू शकतात संजीवनी; वाचा सविस्तर!

सुशांतच्या शरीरावरील ते पांढरे डाग नेमके कशाचे?; फॉरेन्सिक रिपोर्टने केला उलगडा

‘ए मौत तूने मुझें जमींदार कर दिया’; प्रसिद्ध गझलकार राहत इंदौरी याचं निधन