एकपात्री विनोदवीर मुनव्वर फारुकीच्या दिल्लीतील कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नाकारली; ठोस कारण…

दिल्ली | प्रसिद्ध एकपात्री विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी ( Stand up Comedian Munawar Faruqui) हा सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. नुकताच त्याचा दिल्ली येथे आयोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांनी फारुकीला कार्यक्रमाची परवानगी नाकारली. त्यामुळे येत्या 28 ऑगस्ट रोजी दिल्लीत होणारा त्याचा कार्यक्रम रद्द झाला आहे. त्याच्या कार्यक्रमाला विश्व हिंदू परीषदेने (Vishva Hindu Parishad) विरोध केला होता.

त्यामुळे हे प्रकरण तापले होते. आणि आता फारुकीला परवानगी नाकारुन पोलिसांनी त्याचा कार्यक्रम रद्द केला आहे. फारुकीचा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने पोलिस आयुक्तांना केली होती.

त्याचा कार्यक्रम रद्द न झाल्यास त्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विहिंपने दिला होता. परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा (Sanjay Arora) यांना पत्र लिहून तशी मागणी केली होती.

या संदर्भात पोलिसांनी एक अहवाल तयार केला आहे. आणि त्यात त्यांनी कार्यक्रम रद्द करण्याची कारणे स्पष्ट केली आहेत. मुनव्वरच्या कार्यक्रमाने परिसरात धार्मिक सलोखा बिघडू शकतो, असे अहवालात म्हंटले आहे.

फारुकी हा आपल्या कार्यक्रमात हिंदू देवदेवतांची खिल्ली उडवतो. त्यामुळे त्याचा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्ष सुरेंद्र कुमार गुप्ता (Surendra Kumar Gupta) यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या – 

“शिंदे गेले ते बरेच झाले, असंगाशी…”; उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदेवर मोठी टीका

अनुपम खेर यांचे बॉलिवुडबाबत मोठे वक्तव्य; म्हणाले, दाक्षिणात्य चित्रपट कथेवर लक्ष केंद्रीत…

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ; शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले

मोठी बातमी! काँग्रेसला मोठा दणका, एका माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा

‘आदित्य ठाकरेंची दिशा चुकली’ या घोषणेमागील ‘दिशा’ कोण? भरत गोगावले म्हणाले,