मोदींना न घाबरता चर्चा करेल अशा नेत्याची गरज; भाजपच्या या ज्येष्ठ नेत्याचं वक्तव्य

नवी दिल्ली | भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांसोबत निर्भयपणे बोलू शकेल, अशा नेत्याची भारताला आवश्यकता आहे, असं मुरली मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे.

जो तत्त्वांच्या आधारे पंतप्रधानांशी चर्चा करेल तसंच कोणतीही चिंता न करता आपले विचार व्यक्त करू शकेल अशा नेत्याची भारताला गरज आहे ,असं वक्तव्य मुरली मनोहर जोशी यांनी केलं आहे. माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत ते बोलत होते.

जयपाल रेड्डींच्या शोकसभेमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, उप राष्ट्रपती व्यकंय्या नायडू, सीपीएम नेते सीताराम येचुरी, काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

निर्भिडपणे आपले विचार व्यक्त करेल अशा नेत्याची देशाला गरज आहे. त्यानं मांडलेले विचार ऐकून पंतप्रधान खूश होतील की नाराज? याची चिंता त्याला नसावी, असं मुरली मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-