माझ्या मुलांनी फिल्मस्टार बनू नये; दुसऱ्या मुलाला जन्म देताच करीनाने व्यक्त केली इच्छा

मुंबई | अभिनेत्री करीना कपूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच करीनाने आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. करीनाने आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर अली खान असं ठेवल्याने करीना नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. तिच्यावर अनेकांनी टीका केली होती.

अशातच आता करीनाने आपल्या दोन्ही मुलांच्या करिअरबद्दल एक इच्छा व्यक्त केली आहे. माझा मोठा मुलगा तैमूर किंवा लहान मुलगा जहांगीर यातील कोणीच फिल्मस्टार बनू नये, अशी इच्छा करीनाने व्यक्त केली आहे. तिने नुकतीच एका एचटी ब्रँचला मुलाखत दिली.

यावेळी तिने ही इच्छा बोलून दाखवली आहे. यावेळी करीनाने अगदी दिलखुलासपणे गप्पा मारल्या आहेत. आपल्या दोन्ही मुलांच्या स्वभावाबद्दल देखील करीनाने यावेळी सांगितलं आहे.

मुलाखतीत बोलताना करीना म्हणाली की, जेह आता सहा महिन्यांचा झाला आहे. जेह अगदी माझ्यासारखा दिसतो. तसेच तैमूरला आता बऱ्यापैकी गोष्टी समजू लागल्या आहेत. या दोघांनाही मला एक चांगला व्यक्ती बनवायचं आहे. त्यांनी चित्रपट सृष्टीतच यावं, अशी माझी इच्छा नाही.

तैमूर आणि जेहने जरी वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव कमावलं तरी देखील मला आवडेल. उद्या जर तैमूर मला येऊन बोलला की, मला माऊंट एव्हरेस्ट सर करायचा आहे तर मला अधिक आनंदच होईल. शेवटी त्यांच्या करिअरबद्दल सर्वस्वी निर्णय त्यांचा असेल. मात्र, एक आई म्हणून माझा नेहमी दोघांनाही पाठिंबा असेल, असं करीनाने यावेळी म्हटलं आहे.

तसेच करीनाने यावेळी तैमूर आणि जेह मधील फरक देखील सांगितला आहे. ती म्हणाली की, तैमुरला जास्त चेहरे समोर आलेलं आवडत नाही. मात्र, जेहचं याच्या अगदी उलट आहे. जेहला जास्त चेहरे समोर असल्यास खूप जास्त आनंद होतो.

दरम्यान, करीनाने आपल्या धाकट्या मुलाच्या जन्मानंतर बराच दिवस त्याचा चेहरा जगापासून लपवून ठेवला होता. मात्र, करीना आणि सैफ हे दोघे रणधीर कपूर यांच्या घरी भेटीसाठी आले तेव्हा माध्यमांच्या कॅमेऱ्याने जेहचा चेहरा टिपला. यानंतर करीनाने देखील जेहचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

महत्वाच्या बातम्या –

‘ही दोस्ती तुटायची नाय’ म्हणत कॅन्सरच्या उपचारानंतर दोन चिमुकल्यांची पहिली भेट, पाहा व्हिडीओ

राखी सावंतचा ‘स्पायडर मॅन’ डान्स होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ

लस घेतानी तरूणाने जे केलं ते पाहून नर्सही झाली हैराण, पाहा व्हायरल व्हिडीओ

…म्हणून आपला मुलगा आपल्यापासून दूर जातोय; पोस्ट शेअर करत मलायकाने व्यक्त केली भावना

खूशी कपूरने आपल्या ‘या’ लूकने चाहत्यांना पाडली भुरळ, पाहा व्हायरल फोटो