नागपूरात पोलिसांनी हटकल्यानं महिलेचा भररस्त्यात राडा, पोलिसांना शिवीगाळ करत…; पाहा व्हिडीओ

नागपूर | राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कडक नियमावली जाहीर केली आहे. तसेच ती नियमावली पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नागपूरमध्ये देखील सध्या लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. तसेच नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मात्र, तरीही काही लोक नियमांचं उल्लंघन करत पोलिसांशीच हुज्जत घालताना दिसत आहेत.

कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करून पोलिसांशीच वाद घालणाऱ्या नागपूर मधील एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील महिला पोलिसांना अश्लील शब्द वापरताना दिसत आहे.

सध्या नागपूरमध्ये गाडीवरून एकाच व्यक्तीला प्रवास करण्याची परवानगी आहे. तरी देखील ही महिला आपल्या मुलीला घेऊन गाडीवर प्रवास करत होती. यामुळे इतवारी परिसरात शहीद चौकात तिला पोलिसांनी अडवलं. यानंतर तिला कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याने दंड भरण्यास सांगितलं.

मात्र, महिलेने यावेळी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. तसेच अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याची धमकी देखील पोलिसांना दिली. पोलिसांवर आरोप करत महिलेने भररस्त्यात चांगलाच गोंधळ घातला.

सध्या या महिलेची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. तसेच विविध कालामांतर्गत या महिलेवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या काही लोकांनी हा व्हिडीओ कॅमेऱ्यात शूट केला होता.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडीओ पाहून त्या महिलेविषयी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. तसेच पोलिसांला अश्लील शब्द वापरणाऱ्या महिलेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने कर्मचाऱ्यांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय