औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबाबत विधानसभेत मोठा निर्णय

मुंबई | विधानसभेत पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) आज शेवटचा दिवस आहे. आज अनेक लोकोपयोगी निर्णय घेण्यात आले आणि अनेक निर्णय आणि प्रस्ताव संमंत करण्यात आले.

यावेळी औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादच्या (Osmanabad) नामांतराचा प्रस्ताव देखील मंजूर झाला. औरंगाबादचे संभाजीनगर (Sambhaji Nagar) आणि उस्मानाबादचे धाराशीव (Dharashiv) नामांतर करण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला.

त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील (D B Patil) यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला देखील मंजूरी मिळाली. त्यामुळे आज अधिकृतरित्या नामांतराची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

या ठरावावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) बोलले. ते म्हणाले, आज औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर झाले. पण दोन वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज विमानतळाचा प्रस्ताव देखील झाला होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारने या ठरावांसोबतच त्याचाही पाठपुरावा करावा आणि लवकरात लवकर ते नावही देण्यात यावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही आपल्या मागणीची नोंद घेतली आहे, त्यावर तात्काळ पाठपुरावा करण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

बिल्कीस बानो प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाची गुजरात सरकारला नोटीस

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना दणका; विधानसभा सदस्यत्व होणार…

टिपू सुलतान हा ‘मुस्लिम गुंड’ म्हणणाऱ्या नेत्याला जीभ कापून टाकण्याची धमकी

राज ठाकरेंना औरंगाबाद पोलिसांची नोटीस

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने कोर्टात दाखल केली याचिका