नवी दिल्ली | गेल्या 11 ऑगस्ट रोजी विनोदाचे बादशहा राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav) यांना दिल्लीत व्यायाम करताना हृद्यविकाराचा झटका आला आणि ते कोसळले होते. त्यांना तात्काळ दिल्लीच्या एम्स (AIIMS)रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांच्या या अचानक उद्भवलेल्या आजारामुळे त्यांचे कुटुंबीय आणि चाहते चिंताक्रांत झाले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करीत होते. त्यांच्या चाहत्यांनी देव पाण्यात ठेवले होते.
त्यांच्यावर शर्थीचे उपचार सुरु होते. त्यांच्या शरिराने उपचाराला साथ दिल्याने तब्बल 15 दिवसांनी ते आज शुद्धीवर आले. ते शुद्धीवर आल्याने आता सर्वांना दिलासा मिळाला आहे.
शुद्धीवर आल्यावर लगेच त्यांनी त्यांच्या पत्नीसोबत संवाद साधला. त्यांनी त्यांच्या कानात ‘मी ठिक आहे’, असे म्हंटले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचा आनंद गगणात मावेना आणि चाहत्यांचा देखील.
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती ठिक आहे. त्यांना सर्व काही आठवत असून त्यांनी आपण कोण आहोत, कोठे आहोत, असे प्रश्न विचारले असता, त्यांनी त्यांची सर्व उत्तरे दिली.
महत्वाच्या बातम्या –
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबाबत विधानसभेत मोठा निर्णय
बिल्कीस बानो प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाची गुजरात सरकारला नोटीस
झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना दणका; विधानसभा सदस्यत्व होणार…
टिपू सुलतान हा ‘मुस्लिम गुंड’ म्हणणाऱ्या नेत्याला जीभ कापून टाकण्याची धमकी
राज ठाकरेंना औरंगाबाद पोलिसांची नोटीस