अग्निपथ योजनेवरून नाना पटोलेंनी मोदी सरकारला सुनावलं, म्हणाले…

मुंबई | केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवर देशभरात मोठा विरोध दर्शविण्यात येत आहे. लष्करातील भरतीच्या नव्या नियमावर अनेक आक्षेप घेतले जात आहेत. चार वर्षांच्या सेवेनंतर युवकांनी काय करायचं?, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. विरोधकांनी केंद्र सरकार तरूणांचे भविष्य खराब करत आहे, असं म्हटलं आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अजून एक अविचारी आणि मनमानी निर्णय घेतला आहे. अग्निपथ या गोंडस नावाखाली लष्करी सेवेमध्ये केवळ चार वर्षांची नोकरी म्हणजेच तरूणपिढीचं भविष्य अंधकारमय करणारी आहे, असा घणाघात नाना पटोले यांनी केला.

तरूणांना चार वर्षे नोकरी करून पुन्हा बेरोजगारीचा सामना करावा लागणार आहे. मोदी सरकारने घोषित केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरु आहे. कोणत्याही योजनेचा अभ्यास न करता मोदी सरकार योजना अंमलात आणते. आधी कृषी कायदे आणि आता अग्निपथ योजना, असं म्हणत नाना पटोलेंनी निशाणा साधला आहे.

दरवर्षी दोन कोटी नोकरी देण्याचे नरेंद्र मोदी यांचे आश्वासन निवडणुकीतील जुमलाचं ठरला. आता नोकरीच्या नावावर तरूणवर्गाची फसवणूक सुरू आहे. सद्यस्थितीत केंद्र सरकारच्या 62 लाख 29 हजार जागा रिक्त आहेत. त्यामधील 2 लाख 55 हजार जागा भारतीय सेनेमध्ये जागा रिक्त आहेत, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

46 हजार जागा भरती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून घेतला. त्यात सहा महिन्याचे प्रशिक्षण आणि साडेतीन वर्षांची नोकरी केवळ 30 ते 40 हजार रूपये पगार, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

सुरक्षेची कोणतीही हमी नाही. भविष्याची कोणतीही तरतूद नाही. चार वर्षांच्या सेवेनंतर हे तरूण पुन्हा लष्करी सेवेत काम करू शकणार नाहीत. लष्करी सेवेतून बाहेर आल्यानंतर त्यांना सुरक्षारक्षकासारखी नोकरी करावी लागेल किंवा रोजीरोटीसाठी वणवण भटकंती करावी लागेल, असंही नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय कोट्यावधी तरूणांच्या भविष्याशी खेळ असून अग्निपथच्या नावाखाली सुरू असलेला जुमलापथ तरूणांना मान्य नाही. हे देशभर सुरू असलेल्या आंदोलनातून स्पष्टपणे दिसत आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘तुमच्यात दम असेल तर…’; उदयनराजेंचं अजित पवारांना खुलं आव्हान

“जे बोलतो ते CR करतोच, येणाऱ्या काळात पाण्यामधून हायड्रोजन वेगळा काढून त्यावर…”

“मी जेलमध्ये राहूनही डिप्रेशनमध्ये गेलो नाही, तुम्हाला डिप्रेशन कसं येतं?”

दहावीच्या निकालात मुलींची बाजी; 97.96 टक्के मुली उत्तीर्ण 

“राष्ट्रपती निवडणुकीसाठी मी काही डावपेच रचलेत, माझा अर्ज 100 टक्के जाणार”