“काँग्रेसने देशाचा बट्ट्याबोळ केलाय, नाना पटोले हे वगैरे नोटंकीबाज आहेत”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. पण हे आंदोलन पोलिसांनी मध्येच अडवलं. यावेळी पोलिसांनी हे आंदोलन न करण्याची विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांना केली.

पटोले यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर काँग्रेसने आहे त्या ठिकाणीच रस्त्यातच आंदोलन सुरू केलं. बराच वेळ आंदोलन केल्यानंतर अखेर हे आंदोलन थांबवत असल्याचं काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केलं.

आजचं आंदोलन थांबलं असलं तरी पंतप्रधानांनी माफी मागावी या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असं पटोले यांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेसने सागर बंगल्यावरील आंदोलन थांबवलं असलं तरी भाजपच्या कार्यालयांवर होणारं आंदोलन सुरूच राहणार असल्याचंही पटोले यांनी आज स्पष्ट केलं आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसने या देशाचा बट्ट्याबोळ केला आहे. नाना पटोले वगैरे हे नौटंकीबाज लोकं आहेत. त्यांनी कितीही नौटंकी करू द्या. त्याचा काही परिणाम होणार नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंवर केला. तसेच यावेळी त्यांनी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे हात जोडून आभारही मानले आहेत.

काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला. पण मोर्चा फडणवीसांच्या घरापर्यंत येऊ शकला नाही. काँग्रेसने पटोले यांच्या नेतृत्वात काही काळ रस्त्यावर आंदोलन केल्यानंतर हे आंदोलन मागे घेतल असल्याचं जाहीर केलं.

त्यानंतर फडणवीस यांनी बंगल्याबाहेर येऊन कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी पटोले यांच्याव नौटंकीबाज म्हणून टीका केली. तर मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचंही स्पष्ट केलं.

यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली. देवेंद्र फडणवीस आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा भाजपने दिल्या.

महत्वाच्या बातम्या- 

“काँग्रेस बुडवण्यासाठी इतर कुणाचीही गरज नाही, राहुल-प्रियांकाच पुरेसे आहेत” 

‘मी आतापर्यंत आक्रमक होतो पण…’; खासदार संभाजीराजेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा 

‘आय रिपीट, भाजपचे साडे तीन नेते…’; संजय राऊतांच्या नव्या दाव्याने खळबळ 

डॉ. सुवर्णा वाजे प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर

राकेश झुनझुनवालांना मोठा झटका; एका दिवसात झालं ‘इतक्या’ कोटींचं नुकसान