महाराष्ट्रद्रोही भाजप घोषणा देणारे अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात!

मुंबई  | देशाच्या अर्थसंकल्पावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाविकास आघाडी आणि काॅंग्रेसवर जोरदार टीका केली होती. तेव्हापासून राज्य सरकार आणि केंद्र सरकार दरम्यानचा वाद वाढलेला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत नियोजन करण्यात राज्य सरकार कमी पडलं. स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारनं योग्य काम केलं नाही, अशी टीका मोदींनी केली होती.

मोदींच्या टीकेनंतर महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे नेते भाजपवर जोरदार टीका करत आहेत.

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यभरात भाजप कार्यालयासमोर आंदोलन करण्याचं जाहीर केल्यानं राज्यात सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

नाना पटोले यांच्या आवाहनानंतर काॅंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता हा वाद वाढला आहे.

महाराष्ट्रद्रोही भाजपचा निषेध असो, अशा घोषणा लोंढे यांनी दिल्या आहेत. फडणवीस यांच्या घरात जाण्यापासून लोंढे यांना अडवण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी लोंढे यांच्या तोंडावर हात ठेवत त्यांना बोलण्यापासून रोखलं होतं. तरीही लोंढे भाजप विरोधी घोषणा देत होते. ये याला गाडीत घे, असं म्हणत पोलिसांनी त्यांना गाडीत ढकलल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या घरासमोरही काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. सध्या राज्यात विविध ठिकाणी नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

डॉ. सुवर्णा वाजे प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर

राकेश झुनझुनवालांना मोठा झटका; एका दिवसात झालं ‘इतक्या’ कोटींचं नुकसान 

“महिला हिजाब घालत नाही म्हणून बलात्कार होतात” 

राष्ट्रवादीला मोठा झटका, ‘इतक्या’ नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

रूपाली पाटलांची किरीट सोमय्यांवर टीका, म्हणाल्या, ‘लबाड लांडगा…’