बीड | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर असलेल्या तहसील कार्यालयाच्या समोर अनुसुचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं आहे. त्यावरून खासदार प्रीतम मुंडे यांनी टीका केली आहे. (Pritam Munde criticized Dhananjay Munde)
गेल्या चार दिवसांपासून 194 विद्यार्थ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं आहे. बार्टीच्या माध्यमातून देण्यात येणारी फेलोशिप एमफीलच्या दोन वर्षासह 3 वर्षांकरिता देण्यात यावी ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली आहे. परंतु, विद्यार्थ्यांना कोणतेही आश्वासन न देता विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
यावर प्रीतम मुंडे यांनी सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभाग हा मंत्री धनंजय मुंडे यांचा आहे. जर हा प्रश्न धनंजय मुंडे सोडवू शकत नसतील तर आम्ही प्रश्न राज्य शासनाच्या माध्यमातून मार्गी लावू, असं प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत.
मात्र, मुंडेंनी आपल्या खात्याचे प्रश्न सोडवण्याऐवजी बीड रेल्वेच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ नये, असा टोला प्रीतम मुंडे यांनी लगावला आहे.
विद्यार्थ्यांना साधा वेळ देऊ शकत नसतील तर यापेक्षा आणखी दुर्देव काय असणार? असा खोचक सवाल प्रीतम मुंडेंनी केला आहे.
एखाद्याकडे चार-चार खाती असती तर समजू शकलो असतो, मात्र, धनंजय मुंडे यांच्याकडे एकचं खात असून त्यांना प्रश्न सोडवता येत नाही, अशी बोचरी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.
उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘धनंजय मुंडे होश मे आओ’, अशा घोषणा दिल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग भारत सरकारच्या नियमानुसार एम फिल करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना 5 वर्षापर्यंत पीएचडीकरिता फेलोशिप देण्यात येते.
मात्र, सद्यस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून येणारी अभिछात्रवृत्ती 2 वर्षे दिली जात आहे. या गोष्टीची धनंजय मुंडे यांनी दखल न घेतल्याने आम्ही उपोषणाला बसलो आहोत, असं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.
जोपर्यंत आमच्या मागण्या पुर्ण होत नाही तोवर येथून उठणार नाही, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागणीवर मंत्री धनंजय मुंडे काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शाळा-काॅलेज पुन्हा बंद होणार?, आदित्य ठाकरे म्हणतात…
नितेश राणेंना अटक होणार???; पोलिसांच्या हालचालींना वेग
राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?, शरद पवार म्हणाले…
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे; राज्यपालांची हरकत