मुंबई | देशात सध्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तसं राजकीय वातावरण तापायला लागलं आहे. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एका वादग्रस्त वक्तव्यानंतर चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
नाना पटोले यांनी मोदींवर टीका करताना वादग्रस्त शब्दांचा प्रयोग केल्यानं सध्या वाद वाढला आहे. भाजपनं नाना पटोलेंविरोधात मोर्चा उघडला आहे. परिणामी राज्यात शांत असलेलं वातावरण आता राजकारणानं रंगलं आहे.
मी मोदींना मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो, असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं होतं. त्यानंतर राज्यासह देशाच्या राजकारणात खळबळ माजली होती. आता भाजपनं नानांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भंडाऱ्याचे भाजपचे खासदार सुनिल मेढे यांनी नानांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. नानांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार मेढे यांनी केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कालावधी असल्यानं सध्या सर्वत्र पचार शिगेला पोहचला आहे. अशात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे.
नाना पटोले यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळानं पोलिसांना भेटून केली आहे. परिणामी हा वाद आता आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.
नाना पटोले हे भंडाऱ्यात एका सभेत बोलत होते. आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत नाना पटोलेंनी आपल्या राजकीय जीवनावर भाष्य करताना भाजपवर जोरदार टीका केली आहे.
माझ्या नावावर एकही संस्था नाही, कोणता कारखाना नाही. मोदींना माझ्या विरोधात प्रचारासाठी राज्यात यावं लागतं. परिणामी मी भाजपला विरोध करतो, असंही नाना म्हणाले होते.
दरम्यान, नाना पटोलेंच्या एका वक्तव्यानं सध्या राज्यात चांगलाच वाद निर्माण झाला आहे. भाजपनं हा मुद्दा महत्त्वाचा असल्यानं नाना पटोलेंना अटक करण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“झोपेत देखील दिलेला शब्द पाळण्याची सवय मला आई-वडिलांनी लावली”
IPL 2022 Mega Auction: ‘या’ 5 खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली
किंग कोहलीचा उत्तराधिकारी कोण??? ‘या’ खेळाडूच्या नावाची होऊ शकते लवकरच घोषणा
‘माझ्या नादी लागाल तर करील 302’; पिंपरीतील तरुणीची सोशल मीडियावर भाईगिरी
“गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणार आहेत का?”