मुंबई | देशात कोरोना पसरविण्यास काँग्रेस जबाबदार असल्याचं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलं होतं. त्यावरुन राज्यात चांगलंच वातावरण तापल्याचं पहायला मिळालं.
कोरोना संकटामध्ये काँग्रेस पक्षाने मुंबईमधील युपी, बिहारींना त्यांच्या गावाला जाण्यासाठी पैसे दिले. गावाला जा आणि कोरोना पसरवा असं काँग्रेस पक्षाचे लोक सांगत होते, असा गंभीर आरोप पंतप्रधानांनी केला होता.
पंतप्रधान मोदींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील काॅंग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं होतं. अनेकांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं.
काही दिवसांपासून राज्यभरात भाजप कार्यकर्ते आणि भाजप नेत्यांच्या घरावर आंदोलन केलं जात आहे. नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलनाचा इशारा दिला. यावरच आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिआव्हान दिलं आहे.
नाना, तुझ्या आव्हानाला प्रतिआव्हान देतोय. तू उद्या सकाळी 10 वाजता येऊनच दाखव, नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्ही पण भाजप कार्यकर्ते नाही, असं आव्हान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी नाना पटोले यांना दिलं आहे.
सागरवर तू ये, पाहतो तू कसा परत जातो ते, असं म्हणत प्रसाद लाड यांनी नाना पटोले यांना खुलं आव्हान दिलं आहे. पुढं ते म्हणाले की, अती बोलघेवडेपणा बरा नाही नाना पटोले! तऱ्हेवाईक नाना पटोलेंनी सागर बंगल्याच्या जवळ तरी येऊन दाखवावे! मग बघूया!
प्रसाद लाड यांनी अशा आशयाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.
नरेंद्र मोदी माफी मागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशारा पटोले यांनी दिला आहे. पंतप्रधान मोदी छत्रपतींचा अपमान करत होते तेव्हा भाजप सदस्य बाक वाजवत होते, असा आरोप करत याचा निषेध म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर उद्या आंदोलन करणार असल्याचा इशारा नानांनी दिला आहे.
अती बोलघेवडेपणा बरा नाही नाना पटोले!
तऱ्हेवाईक नाना पटोलेंनी सागर बंगल्याच्या जवळ तरी येऊन दाखवावे!
मग बघूया!
ते आहेत आणि भाजपचे कार्यकर्ते आहे.
आता जशास तसे उत्तर मिळेल!– आमदार प्रसाद लाड pic.twitter.com/QpuItb7bKm
— Prasad Lad (@PrasadLadInd) February 13, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
Jayprabha Studio: “आमचं चुकलं असेल तर मी राजकीय संन्यास घेईन”
येत्या 24 तासांत ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
“मी वाघाचा मुलगा आहे, नरेंद्र मोदींना सत्तेतून हाकलून देईन”
“चंद्रकांत पाटील मोठे व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याने बोलणं योग्य नाही”