भारतावर कोरोनाच्या चौथ्या लाटेचं सावट?, तज्ज्ञांचा गंभीर इशारा म्हणाले…

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात कोरोना(Corona) रूग्ण कमी झाल्याने कोराना निर्बंध कमी करण्यात आले होते. राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपासून सर्व कोरोना निर्बंध हटवले आहेत. राज्यात मास्कमुक्ती देखील करण्यात आली आहे. परंतु, देशात पुन्हा एकदा कोरोना रूग्ण वाढताना दिसत आहेत.

देशाची राजधानी दिल्लीत कोरोना रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. रविवारी दिल्लीत कोरोना रूग्णसंख्येत वाढ झाली आहे. यामुळे पॉझिटीव्हिटी दर 4.21 टक्क्यांवर पोहोचला आहे.

कोरोना रूग्ण संख्येत पुन्हा वाढ होत असल्याने चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशभरात पुन्हा कोरोना रूग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूमध्ये म्युटेशन्स होत असल्याने कोरोनावर प्रभावी उपचार शोधणे तज्ज्ञांना कठीण जात आहे. नागरिकांना पुन्हा कोरोना नियमांचे पालन करावे लागेल, असं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने चिंता व्यक्त केली आहे. कोरोना रूग्ण वाढीचा वेग 5 टक्क्यांपेक्षा जास्त राहिल्यास धोकादायक ठरू शकते, असं WHO ने म्हटलं आहे.

राजधानी दिल्लीमध्ये अनेक मुल कोरोना बाधित होत आहेत. यामुळे दिल्ली सरकारने एक मार्गदर्शिका जारी केली आहे. मुलांना जरी कोरोनाची लागण झाली तरी ते लवकर बरे होतात. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं.

तज्ज्ञांच्या मते कोरोनाची चौथी लाट भारतात जूनमध्ये येण्याची शक्यता आहे. ही लाट चार महिने राहण्याची शक्यता आहे. XE व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक असू शकतो.

दरम्यान, मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे यांसारख्या कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. कोरोना नियमांचे पालन होत नसल्यामुळे पुन्हा कोरोना संसर्ग वाढू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

ईडीवरून गोंधळ सुरूच! संजय राऊतांचा भाजपला गंभीर इशारा, म्हणाले…

“तो येईल भाषण करून जाईल, तुम्ही इतकं महत्त्व देताच कशाला”

मलिकांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाचा मोठा दणका

“जेम्स लेन 20 वर्षे कुठं गेला होता?, गाडलेला राक्षस बाहेर काढू नका”

“…तर हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे”