सावधान! Omicron रुग्णांमध्ये आढळली ‘ही’ दोन नवीन लक्षणं, दिसताच ताबडतोब डॉक्टरांकडे जा

मुंबई | कोरोनाचा (Corona) नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन(Omicron) राज्यात आपले हातपाय पसरत चालला आहे. दिवसेंदिवस ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

भारतामध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनबाधितांचा आकडा 976 वर पोहोचला आहे. चिंतेची बाब म्हणजे ओमिक्रॉनची आणखी दोन नवे लक्षणं समोर आली आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने वेळोवेळी ओमिक्रॉनच्या लक्षणांबाबत माहिती देण्यात येत असून, लक्षणे आढळल्यास तातडीने आयसोलेट होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सर्दी, खोकला, तीव्र डोकंदुखी, ताप, अंगदुखी ही आतापर्यंत ओमिक्रॉनचे काही सामान्य लक्षणे होती. मात्र या लक्षणासोबतच ओमिक्रॉनची आणखी दोन लक्षण असल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे.

तज्ज्ञांच्या दाव्यानुसार मळमळ होणे आणि भूक न लागणे ही ओमिक्रॉनची आणखी दोन प्रमुख लक्षणे आहेत. वरील लक्षणांसोबतच ही लक्षणे देखील आढळून आल्यास तातडीने आयसोलेट होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सामान्यपणे सर्दी खोकला, डोके दुखी, अंग दुखी ही ओमिक्रॉनची लक्षणे आहेत. मात्र आता मळमळ आणि भूक न लागणे असे आणखी दोन नवे लक्ष समोर आल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ओमिक्रॉनचा वेग पहाता मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याचा पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्यात आले असून, राज्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

मुंबईमध्ये गेल्या तीन (Mumbai corona cases) दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 3 हजाराच्या पुढे गेली आहे. मुंबई महापालिकेच्या शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती प्रसिद्ध केली आहे.

या माहितीनुसार, गेल्या 24 तासात मुंबईमध्ये तब्बल 3671 नवे रुग्ण आढळले आहे. मागील तीन दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहे. तर 371 रुग्ण गुरुवारी बरे झाल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

“आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे, लगानची टीम नकोय” 

जास्त झाली??? हॅंगओव्हर उतरवण्यासाठी ‘हा’ उपाय करा

गब्बर इज बॅक! रोहित शर्मा संघाबाहेर, ‘हा’ असणार भारताचा नवा कर्णधार

बँकेची कामं आटोपून घ्या! पुढील महिन्यात बँका 16 दिवस बंद, पाहा तारखा

राज्यात कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासात रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ