“…याला अक्कल म्हणतात, मी 40 वर्षात असं पाहिलं नाही”

मुंबई |  कोकणाच्या विकासात महत्त्वाचा वाट असणारी सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा सहकारी बॅंकेचा निकाल आता हाती आला आहे. यात कोकणातील प्रतिष्ठेचं राजकीय घराणं असणाऱ्या राणे (Rane) कुटुंबीयांनी दणदणीत विजय मिळवला.

महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सरळ लढत झाली असली तरी ही निवडणूक राणे कुटुंबानं गाजवली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवर सर्वाधिक काळ सत्ता राखलेल्या राणे गटानं पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे.

अशातच आता या निवडणुकीवरून आता महाविकास आघाडी आणि भाजपने एकमेकांना टोले लगावले आहेत. अजित पवारांनी निवडणुकीच्या वेळी केलेल्या टीकेवर आता नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संस्था वाढवायला अक्कल लागते, त्याला डोकं लागतं. मात्र, बंद पाडायला अक्कल लागत नाही, असा टोला नारायण राणे यांना लगावला होता. त्यावर आता नारायण राणे यांनी अजित पवारांना उत्तर दिलंय.

जबरदस्तीने कायद्याचा वापर करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला गेला. पोलिस यंत्रणांचा वापर केला जातो. नितेश राणे यांचं अॅप्लिकेशन चार चार दिवस चालतात, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

मी 40 वर्षात असं पाहिलं नाही. पोलिसांचा वापर होते. स्वत: अर्थमंत्री याठिकाणी येतात. तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात त्याला अक्कल म्हणतात, असा टोला नारायण राणे यांनी अजित पवारांन लगावला आहे.

दरम्यान, मी आधीच सांगितलं होतं, ते हारणार आहेत. हे ऑटो रिक्षा सरकार आहे.  यांची अवस्था अशीच होणार होती, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

चिमुकल्यानं उचलली चिठ्ठी अन् निकालच फिरला, शिवसेनेला मोठा धक्का

सतीश सावंतांच्या पराभवानंतर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर, ‘ती’ पहिली पोस्ट व्हायरल

‘धरणमूत्र पवार ओकून गेले,अख्खी चिवसेना ओकत होती पण…’; निलेश राणेंचा हल्लाबोल

सिंधुदुर्गात नारायण राणेंचा सेनेला ‘दे धक्का’; सतीश सावंत पराभूत