मुंबई | राज्याच्या राजकारणात कोकणाला एक विशेष महत्त्व प्राप्त आहे. कोकणच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचा निकाल आज घोषित झाला आहे. अनेक अर्थांनी हा निकाल महत्त्वपुर्ण आहे.
भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यातील वाद या निवडणुकीच्या निमित्तानं राज्यानं पुन्हा अनुभवला आहे. या निवडणुकीत राणे कुटुंबाची आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
जिल्हा बॅंकेच्या एकूण 19 जागांपैैकी 11 जागांवर राणे गटानं तर महाविकास आघाडीनं 8 जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रित येवूनही राणे यांचा पराभव करण्यात आपयशी ठरल्याची चर्चा सध्या राज्यात आहे.
महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानं आणि राणे गटाच्या विजयानं राज्यातील राजकारणात जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी मालवाणी भाषेतून महाविकास आघाडीवर टीका केली होती. या टीकेनंतर आता काॅंग्रेस नेते सचिन सावंत यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“शेलारानु, अर्ध्या हळकुंडान पिवळे कित्याक व्हतास? एक खुय जिल्हा बॅंक निवडणूक जिंकलास तरी आमका काय फरक पडाचो नाय. तुमी कितीव हातपाय आपटलास तरी राज्याच्या सत्तेत आमीच आसव”, अशी टीका सावंत यांनी केली आहे.
“पुढची 25 वर्सा महाविकास आघाडीची सत्ताच रवतली. तुमी वाट बगा. तुमच्या भ्रमाचो भोपळो भाजपाच्याच टाळक्यावर फुटतलो”, अशी मालवाणी भाषेतील टीका शेलार यांच्यावर झाली आहे. मालवाणी भाषेतील टीका या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा पहायला मिळाली आहे.
2008 पासून सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवर नारायण राणे गटाचं वर्चस्व आहे. या निमीत्तानं पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवर नारायण राणे यांची सत्ता स्थापन झाली आहे. परिणामी नारायण राणे यांनी देखील पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेची निवडणूक ही विविध प्रकरणानं गाजली होती. आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ला प्रकरणात प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागत आहे. तर भाजपनं महाविकास आघाडी राणे यांना त्रास देत असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, कोकणच्या राजकारणात राणे विरूद्ध शिवसेना हा संघर्ष या निवडणुकीच्या निमीत्तानं अवघ्या महाराष्ट्राला परत एकदा पहायला मिळाला होता. या विजयासह राणे समर्थकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष करायला सुरूवात केली आहे.
पाहा ट्विट –
शेलारानु, अर्ध्या हळकुंडान पिवळे कित्याक व्हतास? एक खुय जिल्हा बॅंक निवडणूक जिंकलास तरी आमका काय फरक पडाचो नाय. तुमी कितीव हातपाय आपटलास तरी राज्याच्या सत्तेत आमीच आसव! पुढची २५ वर्सा महाविकास आघाडीची सत्ताच रवतली. तुमी वाट बगा. तुमच्या भ्रमाचो भोपळो भाजपाच्याच टाळक्यावर फुटतलो. https://t.co/wuTY7gSxJQ
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 31, 2021
महत्वाच्या बातम्या-
“आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, राज्यात तिसरी लाट आली”
सतीश सावंतांच्या पराभवानंतर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर, ‘ती’ पहिली पोस्ट व्हायरल
‘धरणमूत्र पवार ओकून गेले,अख्खी चिवसेना ओकत होती पण…’; निलेश राणेंचा हल्लाबोल
सिंधुदुर्गात नारायण राणेंचा सेनेला ‘दे धक्का’; सतीश सावंत पराभूत
‘मुंबईत बसून हवेत गोळीबार करू नका’; संजय राऊतांचा राज्य सरकारला घरचा आहेर