“राजकारण करण्यासाठी शिवसेना मला त्रास देत आहे”

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद सध्या टोकाला गेला आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला होता.

नारायण राणे यांना पोलिसांच्या चौकशीला आणि अटकेच्या कारवाईचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काही दिवस वातावरण शांत होत पण आता अचानक हा वाद परत वाढला आहे.

कोकणच्या समृद्ध भूमिवर शिवसेना आणि राणे कुटुंबीयांमध्ये सत्तासंघर्ष सातत्यानं पाहायला मिळतो. या भांडणाचे पडसाद महाराष्ट्रात दिसत आहेत. नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीका केली आहे.

नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्याला मुंबई महानगर पालिकेनं नोटीस बजावल्यानंतर राणे आणि शिवसेनमधील तणाव वाढला आहे. राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

माझा बंगला हा संपुर्णपणे कायदेशीर आहे. 1989 ला अधिष बंगल्याचं बाधकाम झाल्यानंतर या इमारतीत कसलाही बदल करण्यात आला नाही. राजकारण करण्यासाठी शिवसेना मला त्रास देत आहे, असा आरोप राणेंनी केला आहे.

मातोश्रीचं बांधकाम केलं, आम्ही काही म्हणालो का?, दोन्ही मातोश्रींचे प्लॅन माझ्याकडं आहेत. नारायण राणेंनी शिवसेनेवर टीका करताना राज्याचे मंत्री छगन भुजबळांचा दाखला दिला आहे.

नितेश राणेंवर शिवसेनेनं शिवसैनिक संतोष परब यांच्या हत्येचा प्लॅन केल्याचा आरोप केला होता. यावर देखील नारायण राणेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणेचा प्लॅनर म्हणून उल्लेख करतात, असं राणे म्हणाले आहेत.

माझ्याकडील माहिती अजून मी बाहेर काढली नाही. मी शरम येणारा बेबी नाही, मी मराठा आहे, असा इशारा राणे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. राणेंनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीच्या अगोदर आता मुंबईत शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तासंघर्ष वाढताना पाहायला मिळत आहे. आम्हाला कोणी राजकारण शिकवू नये, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो ओवेरियन कॅन्सर 

‘कुणाची सुपारी घेऊन आलाय का?’; भर कार्यक्रमात प्रश्न विचारणाऱ्या तरूणावर अजित पवार भडकले 

काय सांगता! दारू आणि तंबाखू सेवनात महिला अव्वल, धक्कादायक आकडेवारी समोर 

“सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते अनावरण!