शिवजयंती तिथीनुसार साजरी का करावी?, राज ठाकरे म्हणतात…

मुंबई | महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यात आज शिवजयंती घराघरात, मनमनात साजरी केली जात आहे. महाराष्ट्राचं सर्वस्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मात्र, याच महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून मागील अनेक वर्षापासून वाद सुरू आहे.

शिवजयंती तिथीनुसार साजरी करावी की तारखेनुसार?, असा सवाल अनेक वर्ष सर्वांनाच पडला आहे. अनेकदा राजकारण्यांनी याच विषयावर आपापली मत देखील व्यक्त केली आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंतीच्या मुद्दयावरून अनेकदा आपलं मत मांडलं होतं.  अशातच आता आज पुन्हा एका कार्यकर्मात राज ठाकरे यांनी शिवजयंती साजरी करण्यामागील कारण सांगितलं आहे.

चांदिवली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यलायचे उद्धाटन पार पाडलं, त्यावेळी राज ठाकरेंनी शिवजयंती तिथीने साजरी का करावी?, यामागील कारण सांगितलं आहे.

मला असं वाटत की आमच्या छत्रपतींची जयंती 365 दिवस आपण साजरी करावी. पण आजही साजरी केली तरी काही हरकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

पण तिथीने का? आणि याचं कारण म्हणजे, आपल्याकडे जेवढे सण येतात दिवाळी असो, गणेशोत्सव असो इत्यादी जेवढे काही सण येतात ते सर्व सण आपण तिथीने साजरे करतो. ते आपण तारखेने साजरे करत नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

जन्मदिवस किंवा वाढदिवस हे आपले असतात. परंतु, महापुरुषांचा आणि तो ही छत्रपतींचा जन्मदिवस म्हणजे आपल्यासाठी तो सणच असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

शिवजयंती सण आपण तिथीने साजरा करायचा. याचा अर्थ आज साजरा नाही करायचा, असा अर्थ होत नाही, असा स्पष्टीकरण देखीस त्यांनी यावेळी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“मी शरम येणारा बेबी नाही, मी मराठा आहे”

महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो ओवेरियन कॅन्सर 

‘कुणाची सुपारी घेऊन आलाय का?’; भर कार्यक्रमात प्रश्न विचारणाऱ्या तरूणावर अजित पवार भडकले 

काय सांगता! दारू आणि तंबाखू सेवनात महिला अव्वल, धक्कादायक आकडेवारी समोर 

“सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील”