नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्चर्यकारकरित्या सोशल मीडियाला बायबाय करण्याचे संकेत दिले होते. नेटकरी मोदींच्या भूमिकेवर अनेक प्रकारच्या शक्कल लढवत होते की मोदींनी हा निर्णय का घेतला असावा? पण त्यांना काही याचं उत्तर सापडत नव्हतं. अखेर मोदींनीच ते उत्तर दिलं आहे आणि ते देखील खास ट्वीट करून…!
या महिला दिनाला ज्या महिलांचे जीवन आणि कार्य आपल्याला प्रेरणा देते अशा महिलांना मी माझे सोशल मीडिया खाते चालवायला देणार आहे. यामुळे त्यांना लाखो लोकांना प्रेरणा देण्यास मदत होईल, अशी माहिती त्यांनी ट्वीट करून दिली आहे.
तुम्ही जर अशा प्रेरणादायी महिलांना ओखळत असाल तर #SheInspiresUs. हा हॅशटॅग वापरून अर्ज करा. आणि माहिती पोहचवा, असंही त्यांनी ट्वीटमधून म्हटलं आहे.
मोदींच्या काल रात्रीच्या ट्वीटनंतर ट्वीटरवर कमेंटसना महापूर आला होता. अनेक लोक त्यांची मतं व्यक्त करत होती. यामधले अनेक लोकं भावूक देखील झाले होते. त्यांनी #NoSir नावाचा हॅशटऍग चालवून मोदींना सोशल मीडिया सोडू नका, अशी विनंती केली होती. दुसरीकडे अनेक राजकीय नेत्यांनी मोदींच्या कालच्या ट्वीटवर टीकेची झोड उठवली होती.
दरम्यान, पंतप्रधान मोदी सोशल मीडिया सोडणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. फक्त महिला दिनाच्या दिवशी ते त्यांचे सोशल मीडिया अकाऊंटस महिलांना चालवायला देणार आहेत.
This Women’s Day, I will give away my social media accounts to women whose life & work inspire us. This will help them ignite motivation in millions.
Are you such a woman or do you know such inspiring women? Share such stories using #SheInspiresUs. pic.twitter.com/CnuvmFAKEu
— Narendra Modi (@narendramodi) March 3, 2020
महत्त्वाच्या बातम्या-
-विद्याताईंची राजकीय प्रतिमा खराब व्हावी म्हणून या भानगडी होतायेत- रूपाली चाकणकर
-देशात शांतता आणि एकता गरजेची आहे- पंतप्रधान
-मुख्यमंत्री आणि जयंत पाटलांच्या वक्तव्याने मुस्लिम आरक्षण जाहीर करणाऱ्या नवाब मलिकांची गोची!
-मुस्लिम आरक्षणावर आमच्यात आणखी चर्चा झाली नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
-माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका!