नाशिक | भाजपने आज विधानसभा प्रचाराचा नाशिकमध्ये नारळ फोडला आहे. पंतप्रधान मोदींच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेचा समारोप होत आहे. या सभेत मोदींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
काँग्रेसची भूमिका मी समजू शकतो. पण पवार साहेबांसारख्या अनुभवी नेत्याला पाकिस्तान चांगला वाटतो?? त्यांना पाकिस्तानातील शासक चांगले वाटतात. त्यांचं त्यांना लखलाभ, असं म्हणत त्यांनी नाशिकच्या सभेत पवारांना जोरदार लक्ष्य केलं.
शरद पवार यांची विधाने क्लेशदायक आहेत. त्यांना पाकिस्तान चांगला वाटतो.. पण पवार साहेब दहशतवादाची फॅक्टरी कुठं आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मी पाकिस्तानात गेल्यानंतर माझं तिथं चांगल्या प्रकारे स्वागत झालं. पाकिस्तानातील भागरिक भले त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी भारतात येऊ शकत नसतील मात्र भारतातून आलेल्या व्यक्तींना ते आपले नातेवाईक समजतात, असं पवारांनी म्हटलं होतं.
नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला आणि यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा बहुमताने भाजप सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या-
बीडमध्ये माझी ‘ती’ चूकच झाली- शरद पवार- https://t.co/FISCsIq2wq @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019
“स्वत: बीडमध्ये पवार साहेब जरी उभे राहिले तरी आता कमळाशिवाय पर्याय नाही”https://t.co/1BrY0XTvjO @Pankajamunde @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019
समान जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; संजय राऊतांचा दावाhttps://t.co/swWu0oCDMh @rautsanjay61 @ShivsenaComms
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019