विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनी आम्हाला फसवलं; संतप्त तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई | वडिलांच्या यकृत प्रत्यार्पण शस्त्रक्रियेसाठी वारंवार मागणी करूनही सरकारी मदत मिळत नसल्याने मंगेश साबळे नावाच्या तरूणाने औरंगाबादच्या टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याची माहीती मिळताच मंगेशच्या वडिलांना रडू कोसळलं. त्यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनी फसवल्याचा आरोप केला आहे. 

मंगेशच्या वडिलांना यकृताचा आजार आहे. त्यांच्यावर यकृत प्रत्यार्पणाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यासाठी मंगेश स्वत:चं यकृत आपल्या वडिलांना देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी 20 ते 25 लाख रूपयांचा खर्च येणार आहे. 

20 ते 25 लाखांचा खर्च करणं साबळे कुटुंबाला झेपणारं नाही. त्यामुळे त्यांनी सरकारी मदत मिळावी प्रयत्न केले मात्र त्याला यश आलं नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला. मात्र मदत मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी बागडेंकडे शिफारस पत्र मागितलं मात्र त्यांनी दिलं नाही, असा आरोप साबळे कुटुंबाने केला आहे. 

बागडेंनी फाईल मागवून घेतली. पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये पाठवलं मात्र तिथेही त्यांनी डॉक्टरांचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे आम्हाला परत यावं लागलं, असा आरोप साबळे कुटुंबाकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि अभिजीत देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. देशमुख यांनी मंगेशला 1 लाख रूपयांची मदत केली. तिथं जमलेल्यांनी 2 लाख 31 हजारांची मदत गोळा करून दिली. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा केली. शिंदेंनी मंगेशच्या वडिलांवर उपचारसाठी मदतीचे आदेश दिले आहेत. 

महत्वाच्या बातम्या-