…म्हणून या सर्वात मोठ्या महामारीशी आपण सामना करू शकलो- नरेंद्र मोदी

मुंबई | ‘मन की बात’ चा आज 84 वा कार्यक्रम होता. 2021मधील ही शेवटची मन की बात होती. या मन की बातमधून पंतप्रधानांनी ओमिक्रॉनपासून ते तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातावरही भाष्य केलं.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावरही त्यांनी भाष्य केलं. देशात ओमिक्रोन व्हेरिएंट आला आहे. त्याचा अभ्यास आपले संशोधक करत आहेत. या व्हेरिएंटचा रोज नवा डेटा त्यांना मिळत आहेत. त्यावरून संशोधक काही सूचनाही देत आहेत. ओमिक्रॉनविरोधात लढायचं असेल तर स्वयं सतर्कता आणि स्वयं शिस्त या दोन गोष्टीचं पालन करा. हीच ओमिक्रॉन विरोधातील ही मोठी शक्ती आहे. आपली सामूहिक शक्तीच कोरोनाचा पराभव करेल, असं मोदी म्हणाले.

ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी देशवासियांना सल्लाही दिला. स्वयं सतर्कता आणि शिस्त यामुळेच आपण ओमिक्रॉनवर मात करू शकतो, असा कानमंत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशावासियांना दिला आहे.

आपल्या जनशक्तीमुळेच आपण कोरोनाचा पराभव करू शकलो आहे. जनशक्तीची ताकद आणि सर्वांच्या प्रयत्नामुळेच आपण 100 वर्षात आलेल्या या सर्वात मोठ्या महामारीशी आपण सामना करू शकलो, असं त्यांनी सांगितलं. तसेच नवं वर्ष चांगलं घालवण्यासाठी संकल्प करण्याचं आवाहनही नरेंद्र मोदींनी केलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातमधून वाचनाचं महत्त्व अधोरेखित केलं. वाचनाचं महत्व सांगतानाच देशात वाचन संस्कृतीशी निगडीत सुरू असलेल्या प्रयोगावरही त्यांनी भाष्य केलं.

नुकतंच माझं लक्ष एका जबरदस्त प्रयत्नाकडे वेधलं गेलं. आपले प्राचीन ग्रंथ आणि सांस्कृतिक मूल्य भारतच नव्हे तर जगभरात लोकप्रिय बनविण्याचा हा प्रयत्न आहे. पुण्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे. या संस्थेने महाभारताचं महत्त्व अधोरेखित करणारा ऑनलाईन कोर्स सुरू केला आहे, असं मोदींनी सांगितलं.

देशभरातील लोकांसाठी हा कोर्स उपलब्ध आहे. हा कोर्स भलेही आता सुरू झाला असेल मात्र, या कोर्समध्ये जो कंटेट शिकवला जातो तो तयार करण्याची सुरुवात शंभर वर्षापूर्वीच झाली होती, असं मोदींनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या- 

‘…तर मी आमदारकीचा राजीनामा देईल’; चंद्रकांत पाटलांचं खडसेंना आव्हान 

रणबीर कपूर हा अजिबात सेक्सी मुलगा नाही, तो आईच्या…- सोनम कपूर 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची 2021 मधील शेवटची ‘मन की बात’; काय बोलणार याकडे देशाचं लक्ष 

एलआयसीची भन्नाट योजना; 1 रुपयाच्या गुंतवणुकीतून मिळवा कोट्यवधीचा फायदा 

‘…तर परिस्थिती चिंताजनक होईल’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली ‘ही’ भीती