67एकर जमीन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीला हस्तांतरित करणार; पंतप्रधानांची मोठी घोषणा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत अयोध्येतील राम मंदिराबाबत निवेदन दिलं आहे. मंदिरासाठी स्वायत्त ट्रस्टची स्थापना करणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारलं जाणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. 67 एकर जमीन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीला हस्तांतरित करणार आहेत. तसेच 5 एकर जमीन सुन्नी वक्फ बोर्डाला देणार असल्याचं नरेंद्र मोदी सांगितलंय.

अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय दिला. अयोध्येतील ती वादग्रस्त जमीन ही रामलल्ला म्हणजे हिंदू पक्षांना देण्यात आली आहे. यानंतर आज लोकसभेत नरेंद्र मोदींनी राम मंदिराबाबत निवेदन दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-एनआरसी देशात लागू करायची यांच्यात हिम्मत नाही- उद्धव ठाकरे

-पवारांना हिंदूविरोधी म्हणनाऱ्यांना आव्हाडांनी धरलं धारेवर

-ओवैसीसुद्धा एक दिवस हनुमान चालिसा म्हणताना दिसतील- योगी आदित्यनाथ

-“देशाला आज गांधीजींसारख्या नेत्याची गरज भासतीय”

-पवार साहेब अजूनही तरूण आहेत, 2024 ला साहेब पंतप्रधान पदावर दिसतील- रोहित पवार