सत्य आणि न्यायाचाच विजय झाला; कूलभूषण जाधव प्रकरणी मोदींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कूलभूषण जाधव यांना नेदरलँडमधील न्यायालयाने बुधवारी संध्याकाळी निर्यण दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 

मला खात्री होती की जाधव यांना नक्कीच न्याय मिळेल. हा सत्य आणि न्यायाचाच विजय आहे, असं मोदी म्हणाले आहेत.  

कूलभूषण जाधव यांच्या खटल्यावर पुर्नविचार करण्यात यावा, असं आंतरराष्ट्रीय न्यायालयाने निर्णय दिला आहे. 16 वकिलांपैकी 15 वकिलांनी भारताच्या बाजूने मत दिलं आहे. 

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. तथ्यांवरील विसृत अभ्यासावर आधारीत निर्णयासाठी आयसीजेचे अभिनंदन, असं म्हणत नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय न्यायलयाच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे. 

कूलभूषण जाधव यांनी पाकिस्तानच्या सैन्याने 3 मार्च 2016 रोजी हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपात बलुचिस्थानमधून अटक केली होती, असा दावा पाकिस्तानने केला आहे.

दरम्यान, आमचं सरकार सदैव प्रत्येक भारतीयांच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी कार्यरत राहील, असंही मोदींनी सांगितलं आहे. 

महत्वाच्या बातम्या- 

-माझ्या वाढदिवसावर वायफळ खर्च करु नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

-चंद्रकांत पाटील म्हणतात शिवसेनेने काढलेला मोर्चा योग्यच!

-मी येतोय… सगळ्यांचे आभार मानायला आणि मनं जिंकायला- आदित्य ठाकरे

-शिवसेनेला मोर्चाच काढायचा होता तर ‘वर्षा’ बंगल्यावर का नाही काढला??- निलेश राणे

-धोनीच्या सेमीफानलच्या खेळीवरून युवराजच्या वडिलांचा अतिशय गंभीर आरोप!