मोठी बातमी! विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल

मुंबई | शिवसेनेकडून काही आमदारांवर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या सगळ्या प्रक्रियेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भूमिका महत्वाची आहे. मात्र  आता नरहरी झिरवळच नॉट रिचेबल लागत आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कालच्या बैठकीत शरद पवार यांनी काही सूचना केल्या आहेत. सभागृहात शिवसेनेच्या आमदारांचं सभासदत्व रद्द झाल्यावर फ्लोअर टेस्टच्या संख्याबळाचं गणित बदलणार आहे.

12 आमदारांवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली. विधिमंडळ कायद्यांतर्गत झिरवळ कारवाई करणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेने 46 पानांची याचिका विधानसभा अध्यक्षांना दिली आहे. ज्यात एकनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या पत्राचा आधार घेऊन त्यातील नमूद 34 आमदारांवर कारवाई करण्याची ही विनंती केली आहे.

सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने तात्काळ बैठकीला हजर राहावे असा पक्षाने व्हीप काढला असतानाही बैठकीला गैरहजर राहणाऱ्या 34 जणांवर कारवाई करण्याची याचिका सेनेने गुरुवारी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! शिवसेना नेते अर्जुन खोतकरांवर ईडीची कारवाई

सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय! गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लिन चीट

‘स्वत:चा मुलगा खासदार आहे त्याचं काय’, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

“बंडखोर आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवा, आम्ही योग्य तो पाहुणचार करू”