‘या’ सीनमुळे नॅशनल क्रश रश्मिका मंदानाला स्लट शेमिंगला सामोर जावं लागलं

मुंबई | करिअरच्या सुरूवातीलाच कमी वेळात सर्वांच्या मनात जागा करणारी.स्वत:च्या सौंदर्यानी चाहत्यांना घायाळ करणारी, दुसरी-तिसरी कोणी नसून सर्वांची नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदना ही हल्ली सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.

रश्मिका आपल्या चाहत्यांच्या सतत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. इंस्टाग्राम या सोशल मीडियावर प्लॅटफोर्मवर तर ती खूपस अॅक्टिव्ह असते. दरररोज ती इंस्टाग्रामवरून स्टोरी अपलोड करते.

तसेच ती तिच्या वयक्तिक आयुष्यात सुरू असलेल्या घडामोडीही तिच्या इंस्टाग्रामवरील चाहत्यांशी शेअर करत असते. त्याचप्रमाणे ती कधी-कधी फोटोही पोस्ट करते.

आपल्याला माहित आहे की, अभिनेते आणि अभिनेत्रींना कोणत्याना कोणत्या कारणांवरून सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. त्याचा त्यांना खूप मानसिक त्रास होत होतो. परंतू काही लोक याचा विचार न करता खूप खालच्या थराला जाऊन त्यांना बोलत असतात.

असंच एकदा रश्मिकालाही सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. रश्मिकाचा ‘गीता गोविंदा’ हा चित्रपटामध्ये तिने केलेल्या एका किसींग सिनमुळे तिला ट्रोल करण्यात आलं होतं.

केवळ घाणेरड्या कमेंट्स नाहीतर रश्मिकाला किसींग सिनमुळे स्लट शेमिंगलाही सामोरं जावं लागलं होतं. एवढंच नाहीतर या सिनमुळे रश्मिकाचं लग्नही मोडलं होतं. परंतू हे सगळं होऊनही तिने चित्रपट करण सोडल नसल्यानं त्यामुळे यावरूनही तिला ट्रोल करण्यात आलं होतं.

‘गिता गोविंदा’ या चित्रपटामध्ये रश्मिका मुख्य भूमिकेमध्ये होती. तिच्यासोबत विजय देवरकोंडा या अभिनेत्यानं मुख्य भूमिका साकारली होती. या दोघांची जोडी खूप गाजली होती. तसेच हा चिपटही खूप सुपरहिट झाला होता.

रश्मिकाने अवघ्या चार वर्षांमध्ये तब्बल 10 चित्रपट केले आहेत. तसेच ती आता बॉलिवूडमध्येही पदार्पन करणार असल्याचं बोललं जात आहे. त्याचप्रमाणे रश्मिका अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा’ या चित्रपटामध्येही आपल्याला पाहायला मिळणार असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

पाण्यात उडी मारायला गेला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

‘सिद्धार्थचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे होऊ शकत नाही’, सिद्धार्थच्या जिम ट्रेनरचा खळबळजनक दावा

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमार्टम रिपोर्ट अखेर पोलिसांच्या हाती, जाणून घ्या काय आहे मृत्यूच कारण

अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर आज होणार अंत्यसंस्कार

चक्क कुत्रा गेलाय पैसे आणि पिशवी घेऊन भाजी मंडईत, पाहा व्हिडीओ