नवी दिल्ली | पाकिस्तानच्या सर्वोच्च सरकारने राष्ट्रात राष्ट्रीय आणीबाणी (National Emergency) जाहीर केली आहे. पाकिस्तानातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकिस्ताने आणीबाणी जाहीर केली आहे.
या भीषण पूरात 937 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर यामध्ये 343 लहान मुलांचा समावेश असून देशातील तब्बल तीस लाख लोक बेघर झाले आहेत. पाकिस्तानातील सिंध (Sindha Provision) प्रांतामध्ये सर्वाधिक मृत्यू झाले.
सिंध प्रांतात 306 जणांना दुर्देवी अंत झाला. 14 जूनपासून या भागांत भरपूर प्रमाणात पाऊस सुरु होता. यावेळी उद्भवलेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये अनेक लोक मृत्यूमुखी पडले.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान (Baluchistan) भागात 234 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पंजाब (Punjab) प्रांतात 165 लोक आणि खैबर-पख्तूनख्वामध्ये 185 लोकांना आपले प्राण गमवावे लागले.
भारताच्या पाकव्याप्त (POK) काश्मीरमध्ये 37 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार पाकिस्तानात ऑगस्ट महिन्यात 166.8 मिलीमीटर पाऊस झाला.
पाकिस्तानच्या सिंध आणि बलुचिस्तान भागांत सर्वाधिक प्रमाणात पाऊस झाला. एकूण पावसाच्या सरासरी 784 टक्के पाऊस जादा पडल्याने ही स्थिती उद्भवली.
पाकिस्तानात दक्षिण पाकिस्तानातमधील सिंध प्रांतातील 23 जिल्ह्यांना नैसर्गिक आपत्तीबाधित म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पूरग्रस्त भागांत मदत कार्य पोहोचवले जात आहे.
सन 2010 साली अशाच स्वरुपाची पूरस्थिती उद्भवली होती. पाकिस्तानचे मंत्री शेरी रेहमान (Sheri Rehman) यांनी या पूराची तुलना 2010 च्या पूरासोबत केली आहे. पाकिस्तानातील रस्ते आणि पूर वाहून गेले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “विधानपरिषद निवडणुकांत…”
नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते; अमेरिकेचे सर्वेक्षण
निवडणूक आयोगाचा शिवसेनेला मोठा दिलासा
‘कोण होतीस तू, काय झालीस…’; गाण्यातून किशोरी पेडणेकरांचा चित्रा वाघ यांना टोला
कुख्यात दहशतवादी संघटना ‘बोको हराम’च्या नावावरुन शिवसेनेने शिंदे गटाला दिले नवीन नाव