नागपूर महाराष्ट्र

“मी मुंबई, महाराष्ट्राची मुलगी, ज्याच्यामध्ये हिम्मत असेल त्यांनी…”

Navneet Rana And Uddhav Thackeray

मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा पठण करण्याचं आवाहन केलं आहे. शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.

अमरावतीमध्ये शिवसैनिकांनी राणा यांच्या निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन केलं. शिवसैनिकांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात जोरदार निदर्शनं केली.

मुंबईतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे शिवसैनिकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शिवसैनिकांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावर नवनीत राणांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मी मुंबई, महाराष्ट्राची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. ज्याच्यामध्ये हिम्मत असेल त्यांनी मला वेळ आणि जागा सांगावी. तेव्हा तेथे येऊन मी हनुमान चालीसा पठण करेन, असं ते म्हणालेत.

अमरावतीच्या खंडेलवाल नगरमधील पगडीवाले हनुमान मंदिर याठिकाणी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या तर्फे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने हनुमान चालीसा पठण करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Kolhapur Election Result 2022 | करुणा शर्मांचा भाजप अन् काँग्रेसवर गंभीर आरोप, केली ‘ही’ मागणी 

उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल; जयश्री जाधव आघाडीवर 

“हम तो डुबेंगे सनम, तुमको भी ले डुबेंगे”

नवरा जेलमध्ये, पत्नीला हवंय मूल; न्यायालयानं दिला मोठा निर्णय 

Multibagger penny stock | ‘या’ शेअरचा धुमाकूळ, गुंतवणुकदार मालामाल