‘महाराष्ट्रात आम्हाला सुरक्षित वाटत नाही’; नवनीत राणांचं खळबळजनक वक्तव्य

नवी दिल्ली | महाविकास आघाडी आणि राणा दाम्पत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद रंगला आहे. आता हा वाद टोकाला गेल्याचं दिसत आहे.

हनुमान चालीसा म्हणण्याचा अट्टहास करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं होतं.

राज्याचे मुंख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बीकेसी मैदानात मोठी सभा घेणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आता राणा दाम्पत्यानं दिल्लीतून ठाकरेंवर टीका केली आहे.

आमच्यावर हनुमान चालिसा म्हणायला परवानगी मागितली म्हणून राजद्रोहाचा खटला दाखल केला पण एमआयएमवर काहीच का केलं नाही?, असा सवाल राणांनी केला आहे.

राज्यात आता आम्हाला सुरक्षित वाटत नाही, राज्य सरकार आम्हाला त्रास देत आहे, असा गंभीर आरोप राणांनी केला आहे. परिणामी आता वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिल्लीत हनुमान मंदीरात हनुमान चालिसा म्हणण्यापुर्वी पत्रकारांशी संवाद साधत ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे.

दरम्यान, ठाकरेंच्या सभेपुर्वी राज्यातील वातावरण तापायला आता सुरूवात झाली आहे. राणांच्या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “ज्यांनी बोलायला पाहिजे ते तर मोदींचे दास झालेत”

 ‘महिला असलीस तरी छपरीच तू’; राष्ट्रवादीकडून केतकीवर जहरी टीका

“राष्ट्ररक्षणासाठी हिंसा करण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलाय” 

दाऊद इब्राहिम गँगच्या टार्गेटवर कोण?; NIA च्या तपासातून धक्कादायक खुलासा 

खासदाराचा न्यूड व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ!