मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बीकेसीतील सभेपूर्वी राज्यातील राजकारण तापायला सुरूवात झाली आहे.
मनसे, भाजप, राणा दाम्पत्य या सर्वांनी सभेपूर्वी शिवसेनेला डिवचण्याचं काम केलं आहे. परिणामी शिवसेना नेत्यांनी देखील सर्वांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
मनसे नेते गजानन काळेंनी आता परत एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना सभेपूर्वी एक सल्ला देण्याचं काम गजानन काळेंनी केलं आहे.
उद्धवजी आपणास आवाहन, बाळासाहेबांचं स्वप्न पुर्ण करा. मशिदींवरील भोंगे, रस्त्यावरील नमाज बंद करू अशी घोषणा करा, असं काळे म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसचा दबाव झुगारण्याची हिंमत आज कराच, टोमण्या पलिकडची आज कृती कराच, असं वक्तव्य गजानन काळेंनी केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी आक्रमक हिंदूत्त्वाचा स्विकार केल्यानंतर राज्याचं वातावरण अगदीच तापलेलं आहे. अशात उद्धव ठाकरे आपल्या सभेतील भाषणानं सर्वांना उत्तर देण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी राज्यातील बहुतांश विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख केला आहे. परिणामी उद्धव ठाकरे आपल्या भाषणात यावर काय बोलतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मा.उद्धवजी आपणास आवाहन…
आदरणीय बाळासाहेब यांचं स्वप्न पूर्ण करा…मशिदींवरील भोंगे आणि रस्त्यावरील नमाज आम्ही बंद करू अशी घोषणा आज कराच…राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा दबाव झुगारण्याची हिम्मत करा…टोमण्या पलिकडची आज कृती कराच…
जय श्री राम…!
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) May 14, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
“ज्यांनी बोलायला पाहिजे ते तर मोदींचे दास झालेत”
‘महिला असलीस तरी छपरीच तू’; राष्ट्रवादीकडून केतकीवर जहरी टीका
“राष्ट्ररक्षणासाठी हिंसा करण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलाय”
दाऊद इब्राहिम गँगच्या टार्गेटवर कोण?; NIA च्या तपासातून धक्कादायक खुलासा
खासदाराचा न्यूड व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ!