‘महाराष्ट्रात माझं सरकार येईल तेव्हा…; राज ठाकरेंनी शेअर केला बाळासाहेबांचा ‘तो’ जुना व्हिडीओ

मुंबई | राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. अशात राज ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे.

राज ठाकरेंना शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये बाळासाहेबांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका मांडल्याचं दिसत आहे.

ज्या दिवशी या महाराष्ट्रात माझं सरकार येईल त्यावेळी रस्त्यावरील नमाज बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की, जो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये, असं बाळासाहेबांनी व्हिडीओत म्हटलंय.

लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल तर त्याने येऊन आम्हाला सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत, असंही त्यांनी म्हटलंय.

महाविकास आघाडीच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा हा व्हिडिओ ट्विट केला असावा का, याची चर्चा सुरु आहे.

याआधी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणार की शरद पवार यांचे ऐकणार, असा सवाल केला होता.

दरम्यान, आज राज ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! नवनीत राणा यांची प्रकृती पुन्हा खालावली, जे जे रूग्णालयात हलवलं  

…तेव्हा रात्री अडीच वाजता राज ठाकरेंना अटक झाली होती, वाचा नेमकं प्रकरण काय होतं? 

भोंगा प्रकरणी उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; उचललं मोठं पाऊल 

शेवटी जुळलंच! राणा दा आणि अंजली बाईंनी उरकला साखरपुडा 

 वाद भोंग्यांचा! मुंबई पोलिसांनी दिली ‘इतक्या’ भोंग्यांना परवानगी