“भाजपला दूध दिसत नाही शेण दिसतं, त्यांचा दृष्टिकोनच तसा आहे”

मुंबई | राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज संपन्न झाली. बैठक संपल्यानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभा अध्यक्षांची निवड ही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात होईल अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. यावेळी बोलताना नवाब मलिक यांनी भाजपवर देखील टीका केली आहे.

भाजप नेत्यांनी केलेल्या कोविड काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपावर बोलताना नवाब मलिक म्हणाले, भाजपला दूध दिसत नाही, शेण दिसतं, अशा शब्दात नवाब मलिक यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) पत्रकार परिषदेवर नारायण राणेंनी टीका केली, याबाबत मलिक (Nawab Malik) म्हणाले की, शिवसेना भवनाचे चित्र, पत्रकार परिषदेत उपस्थित आमदार, खासदार राणेंना दिसत नसतील तर त्याबाबत आम्ही काही बोलू शकत नाही.

राऊतांनी आयटी विभागातील 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार समोर आणला. मी विरोधी पक्षात असताना इथले एजंट कोण हा विषय उपस्थित केला होता. आता अमोल काळेचे नाव समोर आलंय, अजून नाव समोर येतील आता ही सुरुवात आहे,  असं नवाब मलिक म्हणाले.

दोन वर्ष कोविड होता त्यामुळे राजकारण नको ही आमची भूमिका होती. आम्ही लोकांना मदत करत होतो, जीव वाचवत होतो. पण भाजपच्या नेत्यांना प्रत्येक बाबतीत भ्रष्टाचार दिसतो, त्यांना दूध दिसत नाही शेणच दिसतं. भाजपच्या काळात जे भ्रष्टाचार झालाय त्यावर कारवाई होईल असा इशारा नवाब मलिकांनी भाजपला दिला आहे.

संजय राऊत महाविकास आघाडीचे नेते आहेत. राणे भाजपत का गेले. अविघ्न बिल्डींगमध्ये तुमचं काय आहे? अविघ्नची भीती का वाटत होती? ती भीती निर्माण करून तुमचा भाजप प्रवेश कसा झाला याची माहिती आमच्याकडे आहे, असंही नवाब मलिक म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या- 

पोस्ट ऑफिस विभागात तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती; मिळणार भलामोठ्ठा पगार 

भाजप नेत्याने लावले अजित पवारांच्या आभाराचे बॅनर्स, म्हणाले ‘दादा आपले आभार’ 

“…तेव्हा तो पठ्ठ्या कुठे होता?, त्यांनी ही नौटंकी आता थांबवावी” 

“…नाहीतर आम्ही काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला नसता”

Bappi Lahiri | ‘या’ आजारामुळे बप्पी लाहिरी यांचं निधन झालं; तुम्हीही वेळीच काळजी घ्या