“लोक सोमय्यांची धिंड काढतील, तुमचेही कपडे फाडतील त्यामुळे…”

मुंबई | एक दोन नाही ट्रकभरून कागदपत्रे माझ्याकडे आहेत. ही सर्व कागदपत्रं मी आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार आहे. तसेच आता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटायला जात असून त्यांच्याकडेही ही कागदपत्रे देणार आहे, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

संजय राऊत मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. तसेच राऊतांनी यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं आहे.

चंद्रकांतदादांनी या प्रकरणात पडू नये. उघडे पडतील. बेगाने शादी में नाचू नका. लोकं सोमय्यांची धिंड काढतील. तुमचेही कपडे फाडतील. मी तेव्हाही म्हणालो फडणवीसांकडून असं काम होणार नाही. पण त्यांच्या नावाने कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत, असं त्यांनी म्हटलं.

मी आता मुख्यमंत्र्यांना भेटायला चाललो आहे. काय चाललं होतं या महाराष्ट्रात? मी सोमय्यांची रोज एक भ्रष्टाचाराची प्रकरणे काढणार आहे. सोमय्यांची 211 प्रकरणे आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

साडेसात हजार कोटींचा घोटाळा सोमय्या यांनी केला. ज्या माझ्या विरोधात कोर्टात. फडणवीसांना या घोटाळ्याची माहिती असेल असं मला वाटत नाही. दिल्लीतील काही मंत्र्यांच्या नावावर शहांच्या नावावर धमक्या देऊन पैसे काढले आहेत. ही प्रकरणे मी काढत आहे. उखडना है तो उखाडलो, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय.

पेरुबाग पास्कोली येथे 138 एकरचा भूखंड आहे. त्याने साफ केला. पुनर्वसनाच्या नावाखाली 433 बोगस लोकांना आत घुसवले. किरीट सोमय्यांच्या एजंटांनी या पुनर्वसन प्रकल्पात बोगस लोकांना आत घुसवले. माझ्याकडे सर्व कागदपत्रं आहेत. ओरिजनल व्हिक्टीम आहेत, त्यांना धमकावले आहे. पवई पेरुबागच्या झोपडपट्टीच्या पुनर्वसन प्रकल्पावर फडणवीसांनी सही केली. फडणवीसांना हा घोटाळा माहीतही नसेल, असं राऊतांनी सांगितलं.

सोमय्या आणि त्यांच्या एजंटांनी 433 लोकांकडून प्रत्येकी 25-25 लाख रुपये घेतले. म्हणजे 200 ते 300 कोटी रुपयांचा हा व्यवहार आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि ईडी ऐकत असेल तर त्यांनी पहावं, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या- 

“भाजपला दूध दिसत नाही शेण दिसतं, त्यांचा दृष्टिकोनच तसा आहे” 

पोस्ट ऑफिस विभागात तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती; मिळणार भलामोठ्ठा पगार 

भाजप नेत्याने लावले अजित पवारांच्या आभाराचे बॅनर्स, म्हणाले ‘दादा आपले आभार’ 

“…तेव्हा तो पठ्ठ्या कुठे होता?, त्यांनी ही नौटंकी आता थांबवावी” 

“…नाहीतर आम्ही काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला नसता”