नवाब मलिक यांनी अखेर हायड्रोजन बाॅम्ब फोडला; देवेंद्र फडणवीसांवर केले गंभीर आरोप

मुंबई | राज्यात सध्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार वाद रंगला आहे. दोन्ही नेते एकमेकांवर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून टीका करत आहेत.

2014 ला राज्यात सत्तांतर झालं आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्या काळात फडणवीस यांच्याकडे राज्याचं गृहमंत्री पद होतं. यावरून आता राज्यात गदारोळ माजला आहे.

2 ऑक्टोबर रोजी मुंबईत पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणापासून चालू झालेला हा गोंधळ थांबण्याचं नावं घेत नाहीये. भाजप आणि राष्ट्रवादीच्या या दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. त्यातच फडणवीस आणि मलिक हे दोन्ही नेते एकमेकांवर ड्रग्ज प्रकरणात गुंतल्याचे आरोप करत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी 9 तारखेला पत्रकार परिषद घेत मलिक यांच्यावर जोरदार टीका केली  होती. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता.

फडणवीस यांच्या आरोपांना मलिक यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस 2014 ते 2019 राज्याचे गृहमंत्री असताना अनेक बेकायदेशीर काम राज्यात झाल्याचं मलिक म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस पदावर असताना अनेक गुंडाना मोठ्या पदावर बसवण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केल्यानं राज्यात खळबळ माजली आहे. नोव्हेंबर 2016 ला देशात नोटाबंदी झाली तेव्हा अनेकांचा काळा पैसा फडणवीस यांच्या मदतीनेच वाचवण्यात आल्याचा गौप्यस्फोट मलिक यांनी केला आहे.

मुंबईच्या बीकेसीमध्ये खोट्या नोटांचं एक मोठं प्रकरण समोर आलं होतं. यामध्ये 14 कोटी 57 लाखांची खोटी करन्सी पकडण्यात आली होती, असा दावा सुद्धा मलिक यांनी केला आहे.

खोट्या करन्सीच्या प्रकरणात मुंबई आणि पुण्यात दोघांना अटक करण्यात आली पण नंतर हे प्रकरण दाबण्यात आल्याचं मलिक म्हणाले आहेत. परिणामी मलिक यांच्या या आरोपांनी राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे.

फडणवीस गृहमंत्री असताना प्रकरण दाबण्यासाठी गुंडांचे फोन यायचे, असा गंभीर आरोप फडणवीस यांच्यावर मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

मंत्री झालो पण, कोणी नामदार म्हणतच नाही- रावसाहेब दानवे

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 10 हजारांचे झाले इतके कोटी

आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं, सत्याचाच विजय होईल- क्रांती रेडकर 

“इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचं कीर्तन होऊ देऊ नका”

कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूचं सावट! युरोपातील अनेक देशात चिंतेचं वातावरण