कोठडी मिळाल्यानंतर मलिकांचा शायरीतून BJP ला इशारा, म्हणाले…’कुछ ही देर की ख़ामोशी है फिर…’

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना आज ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिक यांच्या अटकेनंतर आता राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, नेते आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केली असून कोर्टात हजर केले असता 7 दिवसापर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. पण, हात दाखवून बाहेर येणारे मलिक यांनी हाताही शायरीच्या अंदाजातून भाजपला इशारा दिला आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली त्यानंतर कोर्टात हजर केले. दोन तासांहून जास्त काळ युक्तिवाद सुरू होता. ईडीने 14 दिवसांची कोठडी मागितली होती पण कोर्टाने सात दिवसांची कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर मलिक यांनी ट्वीट करून खास शायरी केलीये.

कुछ ही देर की ख़ामोशी है फिर शोर आएगा.. तुम्हारा तो सिर्फ वक़्त है हमारा दौर आएगा!!, असं म्हणत नवाब मलिक यांनी भाजपला इशारा दिला.

एवढंच नाहीतर ईडीचे अधिकारी मलिक यांना कारमधून घेऊन जात होते. त्यावेळी मलिक यांनी माध्यमांना हसत हसत हात दाखवला. आज दुपारी सुद्धा मलिक जेव्हा ईडी कार्यालयातून बाहेर आले होते, तेव्हा हात उंचावून हाताची मुठ आवळून पुन्हा लढणार, हरणार नाही, असं नवाब मलिक म्हणाले होते.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वर्षा निवासस्थानावरही महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केलंय.

महत्वाच्या बातम्या- 

सरकारची भन्नाट योजना; एकाचवेळी मिळतील 10 लाख 

“येत्या काही दिवसांत मोठा खुलासा करणार”, फडणवीसांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ 

माजिद मेमन यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले “नवाब मलिक यांना…”

“आता ईडीसमोर बोल नाहीतर तुझ्या हातात विडी देतील”

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सिलेंडर, सीएनजीसह वीज देखील महागण्याची शक्यता