धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीला एनसीबीनं ड्र.ग्ज घेताना रंगेहात पकडलं

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्युनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीला जणू ग्रहणंच लागलं आहे. सुशांतच्या मृ.त्युनंतर चित्रपट सृष्टीची काळी बाजू हळूहळू समोर येवू लागली आहे. सुशांत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत. सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. अशातच आता टेलिव्हिजन विश्वातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीला ड्र.ग्ज घेतना मुंबईत रंगेहात पकडलं आहे. ही अभिनेत्री अं.मली पदार्थांचं सेवन करत असताना धाड टाकत एनसीबीनं ही कारवाई केली आहे. यामुळे मोठ्या पडद्यावरील कलाकारांबरोबरच छोट्या पडद्यावरील कलाकार देखील ड्र.ग्जच तेवढंच सेवन करतात हे आता समोर आलं आहे.

एनसीबीच्या मुंबई झोनल टीमनं या अभिनेत्रीच्या घरावर छापा टाकत कारवाई केली आहे. ही अभिनेत्री ड्र.ग्ज घेत असतानाच कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीनं या अभिनेत्रीच्या घरून बराच माल जप्त केला आहे.

टेलिव्हिजन अभिनेत्री बरोबरच एनसीबीनं एका ड्र.ग्ज पेडलरला देखील ताब्यात घेतलं आहे. माहितीनुसार एनसीबीनं अ.टक केलेल्या अभिनेत्रीबरोबरच ड्र.ग्ज पेडलरशी संबंधित सर्व ठिकाणांवर छापा टाकला होता. या ठिकाणांहून एनसीबीनं गां.जा, कोकेन, एल.एस.डी, एम.डी.एम.ए. जप्त केला आहे.

एनसीबीनं जप्त केलेला सर्व माल आता मुंबईतील एनसीबीच्या कार्यालयात आणला जाणार आहे. अ.टक केलेल्या अभिनेत्रीसह ड्र.ग्ज पेडलरला लवकरच न्यायालयात हजर केलं जाईल. न्यायालय या अभिनेत्रीला पुढे किती दिवसांची को.ठडी सुनावतय हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून एनसीबी चित्रपट सृष्टीतील अं.मली पदार्थ प्रकरणाचा तपास करत आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळल्यानं एनसीबीनं रियाला ता.ब्यात घेतलं आहे. 8 ऑक्टोबर रोजी एनसीबीनं रियाच्या घरावर छा.पा टाकत रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांना अं.मली पदार्थ प्रकरणी अ.टक केलं होतं. .

मुंबई उच्च न्यायालयानं 29 दिवसानंतर रियाचा जामीन अर्ज मंजूर केला होता. मात्र, रियाला जामीन देताना न्यायालयानं अनेक अटी घालून दिल्या होत्या.

रिया चक्रवर्ती बरोबरच बॉलीवूड इंडस्ट्रीतील आणखीही काही दिग्गज अभिनेत्रींची नावे अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत. अभिनेत्री सारा अली खान, दीपिका पदुकोन, नम्रता शिरोडकर या बड्या अभिनेत्री देखील अं.मली पदार्थ प्रकरणी एनसीबीच्या रडारवर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

तुम्हालाही चमकदार त्वचा हवी आहे का? मग ‘हे’ उपाय जरूर करा

…मी फक्त ‘या’ एका गोष्टीसाठी लग्न केलं; राधिका आपटेचा धक्कादायक खुलासा

पक्षांतर करताच कोणी किती भूखंड घेतलेत असं म्हणत एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा!

एकनाथ खडसे यांच्यासह ‘या’ 72 नेत्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश!

भाजपला मोठं खिंडार! भाजपच्या ‘या’ आमदाराच्या पत्नीसह दोन माजी आमदार खडसेंसोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार