राष्ट्रवादीला धक्का, 55 नगरसेवक साथ सोडणार; महापालिकेची सत्ताही जाणार???

मुंबई : विधानसभा निवडणुकांआधीच राष्ट्रवादीच्या एकमेव अशा नवी मुंबई नगरपालिकेवर आता भाजपचा झेंडा फडकणार आहे. नवी मुंबई महानगर पालिकेमध्ये आज सत्तांत्तर होणार आहे. राष्ट्रवादीचे 55 नगरसेवक एक वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

इतकंच नाही तर येत्या 9 तारखेला हे 55 नगरसेवक गणेश नाईकांसोबत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेव सत्ता असलेली महापालिका हातून निसटणार असल्यामुळे शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे 55 नगरसेवक आज पक्षातून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करणार आहेत.

दरम्यान, नवी मुंबईतून राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. तर 9 सप्टेंबरला गणेश नाईकांचा भाजपमध्ये भव्य प्रवेश होणार आहे. यावेळी 55 नगरसेवकांचा गट गणेश नाईकांसोबत भाजपात प्रवेश करणार आहेत.

नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. गणेश नाईक हे 9 सप्टेंबरला नवी मुंबईत भव्य कार्यक्रमात भाजप प्रवेश करणार आहेत. नाईक यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि माजी खासदार संजीव नाईक हेदेखील भाजपमध्ये जाणार आहेत. 

महत्वाच्या बातम्या-