सोलापूर : विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांत राष्ट्रवादी सर्वात मोठे धक्के बसले आहेत. अशातच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे.
माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर ही बैठक होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सात गटातील बबनराव शिंदे समर्थकांची गटनिहाय बैठक होणार आहे. यावेळी आमदार शिंदे हे आपल्या समर्थकांच्या भावना जाणून घेतील.
बबनराव शिंदे हेदेखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंनी कार्यकर्त्यांची बैठक बोलवल्याने ते आता काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगत आहे. मात्र अजून राजकीय वाटाघाटी पूर्ण झाल्या नसल्याने बबनदादा शिंदेंचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रातील किल्ल्यांवर उभारण्यात येणार हेरिटेज हॉटेल्स; गडप्रेमींकडून संताप- https://t.co/b01qsJGQFd #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 6, 2019
“विधानसभेसाठी भाजप-सेनेनं एकत्र यावं” – https://t.co/pL5iJSY9XD @ShivSena @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 6, 2019
जिओची गिगाफायबर ब्रॉडबँड सेवा लॉन्च; पाहा काय आहेत प्लॅन आणि ऑफर…- https://t.co/YMIipALTcv #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 6, 2019