राष्ट्रवादीला मोठं खिंडार; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश???

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षांतर करुन राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहे. त्यातच आता कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक हा या महिन्याच्या अखेरीस भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडीक यांच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काम केल्यामुळे ते नाराज होते. धनंजय महाडीक यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला तर राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जाईल. 

धनजंय महाडीक यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचेे फलटणचे रामराजे निंबाळकर हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. 

रामराजे निंबाळकर यांच्यासोबतच त्यांचे जावई राहुल नार्वेकर आणि फलटणचे आमदार दीपक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, अजित पवारांचे नातेवाईक असलेले पद्मासिंह पाटील घराणं हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत. पद्मासिंह पाटील यांचे चिरंजीव आमदार राणाजगजितसिंह पाटील हेदेखील भाजपमध्ये जाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“महाराष्ट्र सैनिकांचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही”

-राज ठाकरेंना आवडणार नाही असं काहीही करु नका- अविनाश जाधव

-उदयनराजे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच- शिवेंद्रराजे भोसले

-मी वयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला; अभिनेता रणवीर सिंगची कबुली!

-राज ठाकरेंना ईडीची नोटीस; ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या