मुंबई | राज ठाकरे भाजपसोबत येणं हे भाजपसाठी फायद्याचं ठरणार नाही आणि जर राज ठाकरेंनी त्यांच्या भूमिकेत बदल केला तर त्यात त्यांचं नुकसान आहे. त्यामुळे भाजप-मनसे युती होऊ शकत नाही, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ रामदास आठवले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी रामदास आठवले यांनी संभाव्य भाजप-मनसे युतीवर भाष्य केलं आहे.
शिवसेना जरी आज भाजपसोबत नसेल तरी आरपीआय मात्र भाजप, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसांसोबत ताकदिने उभी आहे. दलितांची मतं मिळवण्यासाठी आरपीआयचं भाजपला समर्थन आहे. त्यामुळे राज ठाकरेची काही गरज नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुप्त भेट झाल्यानंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“उतू नका, मातू नका गर्वाचे नाव देवेंद्र फडणवीस, त्यांचा सत्तेचा माज बारामतीकरांनी उतरवला” – https://t.co/chcx9ykvlw @amolmitkari22 @NCPspeaks @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 11, 2020
चहा शरीराला तर चहावाला देशाला घातक; राष्ट्रवादीच्या नेत्याची पंतप्रधानांवर टीका – https://t.co/CidLStZOB8 @amolmitkari22 @narendramodi @BJP4Maharashtra @BJP4India @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 11, 2020
राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य- अजित पवार – https://t.co/USOKvcS7re @AjitPawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020