पंढरपूर : राष्ट्रवादीला बसणारे धक्के थांबण्याची आणि पडलेलं खिंडार बुजण्याची चिन्हं काही केल्या दिसत नाहीत. माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. बबनराव शिंदेंनी सहकार मंत्री सुभाष देशमुखांच्या घरी जाऊन राम शिंदें यांची भेट घेतली. राम शिंदे भाजपच्या मुलाखतीसाठी आले असल्यामुळे बबनरावांचा भाजपप्रवेश निश्चित असल्याचं मानल जात आहे.
बबनराव शिंदेंनी नुकत्याच झालेल्या शिवस्वराज्य यात्रेतही सहभाग नोंदवला नसल्यामुळे ते राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चेला चांगलाच जोर आला आहे. 25 वर्षांपासून आमदार असलेले बबनराव शिंदे हे त्यांचे सुपुत्र, जिल्हा परिषद सदस्य रणजीतसिंह शिंदे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. यासाठी ते पक्षांतर करणार असल्याचं बोललं जात आहे.
रणजीतसिंह शिंदे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबतचं त्यांचं पोस्टर कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं. त्यावेळी पक्षप्रवेशासंदर्भातलं वृत्त त्यांनी फेटाळलं होतं.
बबनराव शिंदे हे आज शिवसेनेच्या दारात, तर उद्या भाजपच्या दारात असल्याची टीका माढ्यात झालेल्या महायुतीच्या महामेळाव्यात शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजीराव सावंत यांनी केली.
बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल आणि करमाळ्याच्या आमदार रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश करत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. तर बबनराव शिंदे हेदेखील भाजपच्या वाटेवर असल्याने राष्ट्रवादीला धक्का बसणार असल्याचं मानलं जातंय.
1 सप्टेंबरला शिंदे यांचा वाढदिवस असून ते याच मुहूर्तावरच भाजपमध्ये प्रवेश करणार की पाच तारखेच्या मेगाभरती वेळी प्रवेश करणार??? हे मात्र आणखी गुलदस्त्यातच आहे.
महत्वाच्या बातम्या-
उदयनराजेंची ‘ती’ इच्छा नक्कीच पूर्ण होईल- चंद्रकांत पाटील – https://t.co/zSLIiJ16qQ @ChDadaPatil @Chh_Udayanraje @BJP4Maharashtra @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 31, 2019
‘एनआरसी’ची अंतिम यादी जाहीर; आसामाच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं न घाबरण्याचं आवाहन – https://t.co/DgOZyfDYcO @Sarwanand_Sonwal
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 31, 2019
“‘अच्छे दिन’चा नारा देणाऱ्या सरकारने अर्थव्यवस्था पंक्चर केली” – https://t.co/1M7CfdJkoU @priyankagandhi @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 31, 2019