महाराष्ट्र मुंबई

सॅड म्युझिक बॅकग्राऊंडला; जितेंद्र आव्हाडांचा ‘हा’ व्हीडिओ होतोय व्हायरल…!

मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय. ‘मुंबई महानगर’ला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर ते आपली उद्वीग्न प्रतिक्रिया व्यक्त करताना ते चांगलेच भावूक झालेले पाहायला मिळाले. हाच व्हीडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होतोय.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार संदीप नाईक आणि चित्रा वाघ यांनी पक्षाला रामराम ठोकला. यावर बोलताना, या नेत्यांना शरद पवारांनी काय कमी केलं होतं?? नेत्यांना सत्तेची इतकी भूक लागलीये की ते कोणाकडेही जाऊन काही कामे करायला तयार आहेत… अगदी भांडी घासायला देखील तयार आहेत, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्या नेत्यांवर हल्लाबोल केला.

पुढे शरद पवार यांच्याविषयी बोलताना जितेंद्र आव्हाड अधिक भावनाविवश झाले. पुरोगामी विचारांचं सरकार आलं पाहिजे… इथली जातीअंध शक्ती सत्तेपासून लांब राहिली पाहिजे म्हणून या माणसाने आपला जीव पणाला लावला. या माणसाने अनेक वर्ष आपल्यासाठी घाम घाळला…. पायाचं हाड तुटलं तरी चालायचं… या माणसाने कॅन्सर झाला तरी भाषणं करायची… चेहरा विद्रूप झाला तरी लढायचं…  लोकांना पक्ष सोडून जाताना काहीच कशी लाज वाटत नाही, अशा शब्दात पवारांवरील प्रेम आणि त्यांच्या मनातील पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांविषयीच्या भावना आव्हाडांनी व्यक्त केल्या.

पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, ज्या वयात बापाला आधाराची गरज असते त्यावेळी ज्यांना आधार म्हणून उभं केलं त्यांनीच पाठित खंजीर खुपसला. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर यावेळी आव्हाड धो-धो बरसले.

आमदार जितेंद्र आव्हाड यांचा ‘तो’ व्हायरल व्हीडिओ-

महत्वाच्या बातम्या-

-नेते सोडून गेले म्हणून राष्ट्रवादीने फोडले फटाके!

-ज्युनिअर आर. आर. पाटील म्हणतात; वेळ बदलते म्हणून ‘घड्याळ’ थांबत नाही…!

-शरद पवारांनी ‘राष्ट्रवादी युवक’वर सोपवली ही मोठी जबाबदारी!

-नगरची जागा न सोडणं अंगलट; राष्ट्रवादीला सुरुंग लावण्यात विखेंचा मोठा वाटा

-होय… खेकडे धरण फोडू शकतात!- आदित्य ठाकरे

IMPIMP